vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मठळक बातम्या

हिंदु जनजागृती समितीच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील पदापर्णानिमित्त कोल्हापुरात सदिच्छा भेट!‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले, या कार्याला आमचे आशीर्वाद आहेत!’ – शृंगेरी पिठाचे शंकराचार्य श्री श्री विधूशेखर भारती महास्वामीजी

हिंदु जनजागृती समितीच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील पदापर्णानिमित्त कोल्हापुरात सदिच्छा भेट!‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले, या कार्याला आमचे आशीर्वाद आहेत!’ – शृंगेरी पिठाचे शंकराचार्य श्री श्री विधूशेखर भारती महास्वामीजी

राज्य प्रतिनिधी -कोल्हापूर : हिंदु जनजागृती समितीच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील पदापर्णाच्या निमित्ताने शृंगेरी शारदा महापीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री विधूशेखर भारती महास्वामीजी यांची समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या वेळी स्वामीजींनी समितीच्या धर्मप्रसाराच्या कार्याचे विशेष कौतुक करत, “समितीचे कार्य चांगले असून या कार्याला आमचे आशीर्वाद आहेत”, असे गौरवोद्गार काढले.

कोल्हापूर येथील ‘श्री अनघादत्तधाम’ या उपक्रमाचा शिलान्यास जगद्गुरु श्री श्री विधूशेखर भारती महास्वामीजी यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला. या मंगल प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. आदित्य शास्त्री आणि श्री. महेंद्र अहिरे यांनी शंकराचार्यांची भेट घेऊन समितीच्या राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी त्यांचे आशीर्वाद ग्रहण केले. या वेळी श्री अनघादत्तधामचे संस्थापक अध्यक्ष वेदमूर्ती सुहास जोशीगुरुजी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

या विशेष भेटीदरम्यान समितीच्या वतीने स्वामीजींना शाल आणि श्रीफळ अर्पण करून त्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. तसेच, समाजात धर्मजागृती करण्याच्या उद्देशाने समितीने प्रकाशित केलेले ‘हलाल जिहाद?, ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण आणि ‘धर्मशिक्षण फलक’ हे तीन महत्त्वपूर्ण ग्रंथ स्वामीजींना सप्रेम भेट देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या रौप्यमहोत्सवी वर्षात साक्षात शंकराचार्यांचे आशीर्वाद लाभल्यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.  श्री. रमेश शिंदे ,राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.(संपर्क क्रमांक : ९९८७९ ६६६६६)

संबंधित पोस्ट

विधानसभा प्रश्नोत्तरे- नो युवर डॉक्टर’ क्यूआर प्रणालीद्वारे डॉक्टरांची नोंदणी तपासता येणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली ग्रीन स्टीलचे जागतिक केंद्र म्हणून विकसित होणार – मंत्री जयकुमार रावल महाराष्ट्राच्या हरित औद्योगिक विकासाला चालना

vishwatmaklokswamivarta

सुराज्य अभियानाचे प्रसिद्धीपत्रक !’सुराज्य अभियाना’च्या पाठपुराव्याला यश : एसटीची राज्यभर ‘डीप क्लीनिंग’ मोहीम !…पण एसटीची ‘मृतावस्थेत’ असलेली हेल्पलाईन कधी बोलणार ?- सुराज्य अभियानाचा सवाल

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे काय म्हणाले ते पहा एक्स वरील संभाषण…

मुंबई-गोवा महामार्गाची पालकमंत्री भरत गोगावले यांच्याकडून पाहणी चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी अडचणींच्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करा* 

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन