vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डॉ. संजय लाखे पाटील यांची महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती*

*डॉ. संजय लाखे पाटील यांची महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती*

जालना/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदी डॉ. संजय निळकंठराव लाखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने यासंदर्भातील अधिकृत शासन आदेश आणि नियुक्ती पत्र जारी केले असून, ही नियुक्ती राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते ना. एकनाथराव शिंदे यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे

   बालहक्क आयोगाचे सचिव पंकज देवरे यांनी डॉ. लाखे पाटील यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच प्रदान केले आहे. ‘महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग’ ही ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांच्या (मुले व मुली) वैधानिक आणि कायदेशीर हक्कांचे संरक्षण करणारी महत्त्वाची संस्था आहे. या आयोगाला अर्धन्यायालयीन अधिकार असून बालकांचे अधिकार, त्यांचे संरक्षण आणि नियमन करण्याची मुख्य जबाबदारी या आयोगावर असते. डॉ. लाखेपाटील यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील बालहक्क अंमलबजावणीला मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

    डॉ. संजय लाखेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ (पोक्सो), बाल शिक्षण हक्क कायदा २००९ (आरटीई) आदी कायद्यांची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी आणि नियमन केले जाणार आहे

. या नियुक्तीबद्दल डॉ. संजय लाखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे विशेष आभार मानले आहेत. बालकांच्या कायदेशीर हक्कांसाठी काम करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ऋणी असल्याचे सांगून त्यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, खा. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के यांच्यासह मंत्रिमंडळातील उदय सामंत, शंभुराजे देसाई, संजय शिरसाट, दादाजी भुसे, संजय राठोड, गुलाबराव पाटील, प्रताप सरनाईक, योगेश कदम आणि ना. जैस्वाल या मंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

    डॉ. संजय लाखेपाटील यांना कायदेशीर क्षेत्रातील सखोल ज्ञान, विविध न्यायालयांमधील खटल्यांचे निकाल आणि प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या या अभ्यासपूर्ण अनुभवाचा फायदा महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या कामकाजात होईल आणि राज्यातील पीडित बालकांना न्याय मिळेल, असा विश्वास सामाजिक स्तरातून व्यक्त होत आहे. त्यांच्या या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

—————-चौकट

महाराष्ट्र शासनाने माझ्यावर सोपवलेली ही जबाबदारी मी अत्यंत विनम्रतेने स्वीकारतो. बालके हा देशाचा आणि राज्याचा आधारस्तंभ आहेत. त्यांच्या वैधानिक आणि कायदेशीर हक्कांचे संरक्षण करणे ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून ती एक सामाजिक बांधिलकी आहे. राज्यातील प्रत्येक बालकाला सुरक्षित वातावरण, दर्जेदार शिक्षण आणि शोषणापासून मुक्ती मिळावी, यासाठी मी कटिबद्ध राहीन. माझ्यावर विश्वास दाखवून ही मोठी जबाबदारी सोपवल्याबद्दल मी उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांचा मनापासून आभारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांच्या कल्याणासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यावर माझा भर असेल.– *डॉ. संजय लाखे पाटील*

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्यात 15 दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट-जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही

vishwatmaklokswamivarta

गुन्हेगारी घटनांवर नियंत्रणासाठी जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचा आढावा घ्यावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील,क्राईम टास्क फोर्सच्या बैठकीत केल्या सूचना…

राष्ट्रीय लोक अदालतीस पक्षकारांचा चांगला प्रतिसाद

डाक जीवन विमा योजनेचे प्रीमिअम भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा..

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी – धारावी बस डेपो जवळ गैस सिलेंडरच्या ट्रक मध्ये लागली आहे भीषण आग…

दिवंगत नेते रा. सू. गवई स्मारकाचे गुरुवारी उद्घाटन*मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta