vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

गर्भलिंग निदानाविरुद्ध जनजागृती करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

गर्भलिंग निदानाविरुद्ध जनजागृती करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- मुलींचा घटता जन्मदर ही समाजासाठी भूषणावह बाब नाही. मुलींची गर्भातच हत्या करणे हे तर अमानूष कृत्य आहे. जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढविण्यासाठी गर्भलिंद निदान चाचण्याविरुद्ध जनजागृती करणे आवश्यक आहे. ती जनजागृती प्रभावी पणे राबवून गर्भलिंननिदान व पश्चात गर्भपाताविरुदद्ध गोपनीय माहिती देणाऱ्यांना सन्मानित करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

 प्रसवपुर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी)अंमलबजावणी समितीच्या जिल्हास्तरीय समितीची आज बैठक पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, डॉ. किशोर महाले. डॉ. जगदीश वठार, डॉ. मनिषा भोंडळ, उप प्रादेशीक परिवहन अधिकारी मनिष दौंड तसेच अन्न औषध प्रशासन विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी स्वामी म्ह्णाले की, पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी प्रभावी पणे होण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी गोपनीय माहिती देणाऱ्या व्यक्तिंनाही प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना योग्य ते पारितोषिक दिले पाहिजे. त्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर रकमेची माहिती देऊन जनजागृती करावी,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

      जिल्हा एडस प्रतिबंधक व नियंत्रण समिती, तसेच संसर्गजन्य आजार, सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना यांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.०००००

संबंधित पोस्ट

रायगड जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन   — जिल्हाधिकारी किशन जावळे क्षयरोग मुक्त 376 ग्रामपंचायतींचा सत्कार

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पत्रकार चौक ते डीएसपी चौक येथे एलईडी पथदिव्यांचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

बोगस बियाणे- कीटकनाशक कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नवीन कायदा आणणार – केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी ३६७ कोटींचा निधी वितरित

शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा चक्का जाम आंदोलनास प्रचंड प्रतिसाद सुमारे दीड तास वाहतुक कोलमडली : दुरदुरपर्यंत वाहनांच्या रांगा…

पोटखराबा क्षेत्र लागवडीयोग्य होणार; आजपासून 10 एप्रिलपर्यंत जिल्हा प्रशासनाचा कालबद्ध कार्यक्रम जाहिर

vishwatmaklokswamivarta