vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसोबत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची, दीर्घकालीन उपाययोजना – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांची चाकणला भेट; रस्ते दुरुस्तीची पाहणी

पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसोबत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची, दीर्घकालीन उपाययोजना – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्र्यांची चाकणला भेट; रस्ते दुरुस्तीची पाहणी

पुणे, प्रतिनिधी : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि येथील उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे. उद्योजकांना पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन पावले उचलली जात असल्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज तळेगाव, चाकण येथे भेट देवून रस्त्यांच्या दुरुस्ती कामाची पाहणी तसेच उद्योजकांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार शरद सोनवणे, आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह चाकण व तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी होणाऱ्या विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थितीची माहिती घेतली. यादरम्यान त्यांनी एम-६० हार्डनरचा वापर करून खड्डे बुजवण्याचे काम आणि पावसाने खराब झालेल्या रस्त्यांवर थेट कास्टिंग केलेले पॅचेस बसवण्याच्या कामाची पाहणी केली. या नवीन तंत्रज्ञानामुळे कमी वेळात रस्ता पूर्ववत करून त्यावरून अवजड वाहने सोडणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चाकण-शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा मोठा फटका उद्योजकांना बसत आहे. पावसाळ्यात पारंपरिक डांबरीकरण टिकत नसल्याने यावर मात करण्यासाठी जिओ पॉलिमर टेक्नो पॅच आणि एम-६ आरएमसी विथ हार्डनरचा वापर केला जात आहे. जिओ पॉलिमर मिश्रणाला अर्धा ते पाऊण तासातच सेट होत असल्याने खड्डे भरल्यानंतर तातडीने वाहतूक सुरू करणे शक्य होत आहे. तसेच सर्वाधिक खराब झालेल्या ठिकाणी प्री-कास्ट पॅनेल ट्रेलरद्वारे आणून थेट बसवण्यात येत आहेत.औद्योगिक क्षेत्रातील समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष नोडल समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीची बैठक आता दर शुक्रवारी होणार आहे. रस्ते, ड्रेनेज, फुटपाथ आणि स्ट्रीट लाईट्ससह पायाभूत सुविधांच्या विकासावर या समितीमार्फत भर दिला जाईल. तसेच चाकणमध्ये येणाऱ्या वाहनांची ये-जा सुलभ व्हावी यासाठी तळेगाव ते शिक्रापूर या ५४ किलोमीटर मार्गाची दुरुस्ती, नाशिक फाटा ते राजगुरुनगर रस्ता आणि अंतर्गत रस्ते बांधणीला गती दिली जाणार असून रस्ते बांधताना फुटपाथ, युटिलिटी आणि सायकल ट्रॅकचा समावेश करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कामगारांच्या प्रवासाचा वेळ वाचावा यासाठी औद्योगिक क्षेत्रात क्लस्टरच्या माध्यमातून कामगार वसाहती (टाउनशिप) उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच निगडी ते चाकण, चाकण ते राजगुरुनगर आणि तळेगाव ते शिक्रापूर या मेट्रो मार्गांचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश महामेट्रो प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.उद्योजकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंते व इतर अधिकारी आठवड्यातून एक दिवस प्रत्यक्ष उपलब्ध राहतील. तसेच उद्योजकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी ‘मैत्री’ ॲपचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. वीज ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून लोडशेडिंगचे नियोजन करणे, स्वतंत्र एजन्सीमार्फत कचऱ्याची विल्हेवाट लावणे तसेच पाणीपुरवठा व पोलीस प्रशासनाशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवण्याबाबतही बैठकीत निर्णय घेण्यात आले. शासनाच्या या सर्व उपाययोजनांमुळे उद्योजकांच्या समस्यांचे निवारण होऊन त्यांचे समाधान झाले असून, उद्योजकांनी आपले उद्योग बाहेर नेण्याबाबतचे मतपरिवर्तन झाल्याचे यावेळी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नायक’ आणि ‘अर्जुन’ टीबीएमचा शुभारंभ- ठाणे-बोरिवली प्रवासाचे अंतर आता फक्त १५ मिनिटांवर

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचयतींच्या सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

पायाभूत सुविधांद्वारे नागपूरला सुव्यवस्थित शहराचे स्वरूप देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपुलाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री शेताच्या बांधावर-शेतकऱ्यांना भरीव मदत देणार – मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील • चिखली व सिंदखेडराजा तालुक्यातील बाधित गावांना पालकमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट • एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; प्रशासनाला निर्देश

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासात सर्वांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हा नियोजन समितीची