vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासह विविध क्षेत्रांत सहभाग वाढविण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मंथन फॉर युवा’ उपक्रमाचा समारोप: महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन; विक्रमांत नोंद

युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासह विविध क्षेत्रांत सहभाग वाढविण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,‘मंथन फॉर युवा’ उपक्रमाचा समारोप: महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन; विक्रमांत नोंद

नागपूर प्रतिनिधी: शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग वाढविण्यासोबतच संपूर्ण मदत देण्यात येईल त्यासोबत स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये चर्चा करून चांगली पॉलिसी तयार करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी आज दिली.

रेशीमबाग मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मंथन फॉर युवा’ या या उपक्रमांतर्गत ढोल ताशा पथकाचा जागतिक विक्रम तसेच विविध क्षेत्रातील आयकॉन असलेल्या व्यक्तींसोबत थेट संवाद, नशामुक्त महाराष्ट्र व देश यासाठी युवकांना शपथ आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २५ हजार पेक्षा जास्त युवक व युवतींनी सहभाग नोंदवला.महाराष्ट्राची परंपरा असलेल्या ढोल ताशा पथकाने एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये जागतिक विक्रम नोंदविला आहे. आधार नोंद असलेल्या ५८५ ध्वजधारकांच्या या उपक्रमामुळे जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वविक्रम केल्याबद्दल संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.२५ हजारांपेक्षा जास्त युवकांच्या साक्षीने हा उपक्रम पूर्ण झाल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजची युवा पिढी सर्वच क्षेत्रात आपल्या कौशल्याने नावलौकिक मिळवीत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक सहभाग लाभलेल्या ध्वजधारकांच्या समावेशाबद्दल विश्वविक्रमामध्ये नोंद झाली असून यापूर्वी २६० ध्वज धारकांच्या समावेश असलेला विक्रम आज मोडीत निघाला आहे.सुप्रसिद्ध क्रीडा समालोचक रिधिमा पाठक यांनी युवकांचे आयकॉन असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत क्रिकेटपटू तिलक वर्मा, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेते दिलीप महादू गावित, अर्जुन देशपांडे, किरण शहाजी यांच्याशी संवाद साधताना विविध क्षेत्रातील त्यांच्या कार्याची प्रेरणा व अनुभव युवकांसमोर मांडले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संविधानामुळेच लोकशाही प्रगल्भ झाली आहे. आपल्या लोकशाहीमुळेच मला नगरसेवक, महापौर, आमदार आणि मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. संविधानामुळेच आपल्या आकांक्षा व विश्वास पूर्ण करण्यासाठी कुणीही थांबू शकत नाही असे सांगत ते आपल्या राजकीय व सामाजिक वाटचालीबाबत युवकांसमोर व्यक्त झाले. स्टार्टअप संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, युवकांना शासनाची संपूर्ण मदत करण्याचे धोरण असून स्टार्टअपसाठी इकोसिस्टीम पॉलिसी तयार करण्यात आली आहे. या धोरणामध्ये युवकांना शंभर टक्के मदत करण्याचा उद्देश असल्याने युवकांसोबत चर्चा करून आणखी चांगली पॉलिसी तयार करण्यात येईल, असा विश्वास यावेळी त्यांनी दिला.

मुलांमध्ये असलेल्या सर्वाधिक स्क्रीन टाईम बद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी विचारमंथन सुरू आहे. स्क्रीनवरून मैदानावर कसे वळता येईल याबद्दलही या क्षेत्रातील तज्ञांकडून निश्चित धोरण ठरविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी मंथन फॉर युवाचे आयोजक रितेश गावंडे यांनी स्वागत करून या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. एक ऑगस्ट एक ते 23 ऑगस्टपर्यंत या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असून या उपक्रमातील यशस्वी स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील आयकॉन म्हणून ओळख असलेल्या युवक व युवतींचा गौरव करून त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची माहिती देण्यात आली. नशा मुक्त भारत या अंतर्गत युवकांना नशा मुक्तीची शपथ देण्यात आली. यामध्ये अमली पदार्थमुक्त जीवनशैली या व्यसनापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा त्यासोबतच अमली पदार्थांचा वापर अथवा विक्री कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही तसेच आपली अमली पदार्थमुक्त युवा पिढी घडविण्यासाठी सक्रिय सहभाग याबद्दल युवकांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शपथ दिली. आयोजक विष्णू चांगदेव यांनी आभार मानले.

 

संबंधित पोस्ट

बुलढाण्यात २२ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी

२० हजार ७०० कोटींच्या ३२६ किमी मालवाहतूक मार्गिकेच्या तीन टप्प्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण**समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती; जेएनपीएहून मालवाहतुकीचा वाढणार वेग आणि क्षमता-  पंतप्रधान नरेंद्र मोदी*समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका नेटवर्क पूर्ण होणे ही ऐतिहासिक उपलब्धी* राज्यपाल जिष्णू देव वर्मा२०३० पर्यंत जेएनपीए हे देशातील दशलक्ष टीईयूपेक्षा अधिक क्षमता असलेले ठरणार पहिले बंदर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

vishwatmaklokswamivarta

परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी भाषा आवश्यक — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बुधवारी (दि.११) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहूंना कृतज्ञ अभिवादन : ट्रस्टतर्फे दसरा चौकात पुष्पांजली

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून  मोठी  ऐतिहासिक आनंदाची बातमी -भारतीय भूमीवर जन्मलेल्या ‘गामिनी’ने दिला ४ बछड्यांना जन्म 🇮🇳