vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मूग-उडीद पीकस्पर्धेसाठी अर्जाची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढ; खरीप पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

मूग-उडीद पीकस्पर्धेसाठी अर्जाची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढ; खरीप पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी: राज्यातील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत खरीप हंगाम 2026-27 साठी राज्यांतर्गत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. यंदापासून प्रथमच या स्पर्धेसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारले जात असून, मूग व उडीद पीकस्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत शासनाने 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविली आहे.

यापूर्वी मूग व उडीद पिकांसाठी अर्जाची अंतिम मुदत 31 जुलै होती. मात्र, ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचे हे पहिलेच वर्ष असल्याने शेतकऱ्यांची सोय लक्षात घेऊन शासनाने “एक वेळची विशेष बाब” म्हणून मुदतवाढ दिली आहे. या स्पर्धेचा उद्देश शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतलेल्या अधिक उत्पादनाला प्रोत्साहन देणे, त्यांचा गौरव करणे आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ इतर शेतकऱ्यांनाही मिळवून देणे हा आहे. तालुका स्तरावरील उत्पादनाच्या आधारे जिल्हा व राज्यस्तरीय विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.

खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या एकूण ११ पिकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती स्वतः कसत असणे आवश्यक आहे. संबंधित पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे बंधनकारक आहे. एका शेतकऱ्याला एकापेक्षा अधिक पिकांसाठीही स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

अर्जासाठी फार्मर आयडी, प्रवेश शुल्काची चलन पावती, आदिवासी गटासाठी जात प्रमाणपत्र आणि बँक खाते तपशील आवश्यक आहेत. सर्वसाधारण गटासाठी प्रवेश शुल्क 300 रुपये, तर आदिवासी गटासाठी 150 रुपये निश्चित करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर अनुक्रमे रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. राज्यस्तरीय प्रथम क्रमांकासाठी 50 हजार रुपये द्वितीयसाठी 40 हजार रुपये आणि तृतीयसाठी 30 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

मूग व उडीद पिकांसाठी 10 ऑगस्ट 2026 तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल 31 ऑगस्ट 2026 अर्जाची अंतिम मुदत आहे. कृषी विभागाच्या संकेतस्थळावरील पीकस्पर्धा टॅबद्वारे ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकांकडून भक्तिरसपूर्ण गायन व नृत्यवंदना !भारतासह २३ देशांतील ३० हजारांहून अधिक भाविकांनी या महोत्सवाला उपस्थिती

धारावीतील ज्येष्ठांनी मांडली प्रदूषण मुक्त दिवाळीची संकल्पना…

vishwatmaklokswamivarta

ग्राहकांनी गॅस सिलिंडरसाठी आगाऊ बुकींग करू नयेजिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन*घरपोच सेवा देण्यासाठी यंत्रणा राबविणार

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजीचा अधिक चांगला वापर करण्याबाबत प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सरकारने उचललेली पावले

vishwatmaklokswamivarta

उद्योगांसाठी कर्ज योजनेचे अर्ज तातडीने निकाली काढावेत- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

सोलापूर शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल-महापालिकेच्या इंद्रभुवन येथे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे