vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा…

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा…

 

        नवी मुंबई प्रतिनिधी  नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे मुख्य जलवाहिनीवरील सुधारणा करण्याच्या कामासाठी महानगरपालिका क्षेत्रामध्ये दि. 13 मे 2026 व दि. 14 मे 2026 असे दोन दिवस शटडाऊन घेण्यात आलेला होता. हे काम पूर्ण झाल्यानंतर दि. 15 मे 2026 पासून पाणी पुरवठा सुरळीत झालेला आहे. तथापि शटडाऊनच्या काळात पाईपलाईन बंद असल्याने तो सुरू झाल्यानंतर काही भागात एक दिवस गढुळ पाणी पुरवठा झाला होता. मात्र त्यानंतर आता स्वच्छ पाणी पुरवठा सुरू झालेला आहे.

          तथापि काही प्रसारमाध्यमांमध्ये याबाबत आलेल्या बातम्यांच्या अनुषंगाने जुईनगर येथील अपोलो सोसायटी व त्या लगतच्या सोसायट्यांमध्ये विभागातील अभियंतांनी तेथील रहिवाशांसोबत पाणी नमुने तपासून घेतले आहेत व ते पिण्यायोग्य असल्याचे आढळले आहे. या सोसायटीमधील रहिवाश्यांनीही शटडाऊननंतर एक दिवस गढुळ पाणी आले होते व त्यानंतर स्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याचे सांगितले तसेच सद्यस्थितीत गढुळ पाण्याची तक्रार नसल्याचे सांगितले. अशाचप्रकारे नेरूळ, सानपाडा व इतर क्षेत्रातही पाणी नमुने तपासणी करण्यात आली व पाणी नमुने स्वच्छ व पिण्यायोग्य असल्याचे आढळून आले.

          त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील नागरिकांना सूचित करण्यात येते की, सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी पुरवठा होत आहे याची नोंद घेण्यात यावी व याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित विभाग कार्यालयात अथवा 1800222309 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

 

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन• *नागरिकांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी संबंधीत पोस्ट करण्याचे आवाहन*• *शालेय विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

इंदापूर शहरात झालेल्या पावसामुळे बाधित भागाची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी

vishwatmaklokswamivarta

लंडन मधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन· गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध· अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने· राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही· समाजमाध्यमांवरील खोट्या/बनावट बातम्यांवर कारवाई· अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून मराठी भाषेत ज्ञान, सेवा व विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होणार – संतोष साळवी कृत्रिम बुद्धिमत्ता व मराठीतील वापरावर चर्चा

उमेद अभियानातून महिला उद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणास मिळणार चालना – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन-स्वयंसहाय्यता बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्धतेसाठी

vishwatmaklokswamivarta