vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

इंदापूर शहरात झालेल्या पावसामुळे बाधित भागाची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी

इंदापूर शहरात झालेल्या पावसामुळे बाधित भागाची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी

पुणे, प्रतिनिधी: इंदापूर शहरात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे इंद्रेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यावर पाणी साचून नागरी वस्तीत पाणी शिरले होते, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या नागरी वस्तीला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी इंदापूर नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे, माजी नगराध्यक्ष भरतशेठ शहा, अशोक इजगुडे, माजी उपनगराध्यक्ष कृष्णा ताठे, माजी नगरसेवक, व्यापारी व नागरिक आणि नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

भरणे म्हणाले, इंदापूर शहर व परिसरात यापुढे अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये, याकरिता पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत नगरपरिषदेने तातडीने सविस्तर आराखडा तयार करावा. मान्सून काळात रोगराई पसरू नये, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. संपूर्ण परिसरात साफसफाई राहील, याबाबत दक्षता घ्यावी. सद्यस्थितीत नागरिकांची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.

मुसळधार पावसाच्या काळात नागरिकांनी प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे. साचलेल्या अथवा वाहत्या पाण्यात उतरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. भरणे यांनी केले.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन -शेखर मुंदडा,पशुसंवर्धन आयुक्तालय येथून होणार शुभारंभ१५ दिवसांत ६ हजार किमीचा प्रवास; ३५ जिल्ह्यांतील १ हजार गोशाळांचा सहभाग

सुषमा स्वराज या अष्टपैलू प्रतिभावंत राजकारणी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

उद्योजकांना उद्योजकांकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाच्या विविध कर्ज योजना…

महिला व बालकांसाठीच्या संरक्षण, प्रतिबंधात्मक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा    – जिल्हाधिकारी संतोष पाटील

मोटार वाहन कर व दंड वसुली मोहिमेअंतर्गत कामगिरीची माहिती जाहीर

इंडियाज टॅलेंट फायटसाठी जालन्यातील अवेश हमीद खान यांची निवड