vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, प्रतिनिधी श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थानाला ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व असल्याने याठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात; त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन परिसर विकास आराखडा तयार करा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थान येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि बारवाचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, कार्यकारी अभियंता अमोल पवार, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी किशोर माने, पंचायत समितीचे उप अभियंता शिवकुमार कुपल, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संग्राम सोरटे, श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत मोकाशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होत

पवार यांनी श्री सोमेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर परिसरातील कामांची पाहणी करताना ते म्हणाले, श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान येथे येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही, यादृष्टीने विकासकामे करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्यावतीने देशी झाडाला प्राधान्य दिले असून या परिसरात हवामानारुप वृक्षारोपण करावे. झाडांच्या मुळ्या बाहेर आल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करा. देवस्थान परिसर स्वच्छ राहील, याबाबत ट्रस्टने दक्षता घ्यावी. दुकानाच्या गाळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन अहवालप्रमाणे कार्यवाही करावी.

मौजे सोमेश्वर (करंजे) येथे वाहनतळ बांधकामाकरिता ७७ लाख २९ हजार ७२५ इतक्या रुपये तसेच संरक्षक भिंतीचे बांधकामाकरिता ५१ लाख ३ हजार ७०६ इतक्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आगामी ५० वर्षाचा विचार करुन विकास आराखड्यात महिला व पुरुष स्वच्छतागृह, देवास्थानाचा मुख्यद्वार, पायरी, विद्युतव्यवस्था, अन्नछत्रालय, भक्त निवास, रस्ते, पाणी, सोलर पॅनेलची व्यवस्था, वाहनतळ, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, भाविकांना बसण्याची व्यवस्था आदी सुविधांचा समावेश करुन विस्तृत आराखडा तयार करा, अशी सूचना श्री. पवार यांनी केली.

संबंधित पोस्ट

सोयाबीन व भुईमूग या पिकांसाठी मूल्य साखळी भागीदार निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पत्रकारांसाठी ‘एआय’चे प्रशिक्षण कौशल्यवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा‘एआय’ मुळे पत्रकारिता अधिक तंत्रज्ञानयुक्त

vishwatmaklokswamivarta

बारावी जीवशास्त्रची परीक्षा जिल्ह्यातील 109 परीक्षा केंद्रावर सुरळीत : जिल्हाधिकारी राहूल कर्डिले· कंधार तालुक्यात पानभोसी केंद्रावर पेपर संपेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती· जिल्ह्यात 98.24 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती  जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या भरारी पथकामार्फत निगरानी…

रायगडमध्ये 14 फेब्रुवारीला शासकीय योजनांचा महामेळावा- विधी सेवा शिबिर, एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आगामी शाळा प्रवेश उत्सव भव्य व गुणवत्तापूर्ण करावा

बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे मानले आभार