vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सोयाबीन व भुईमूग या पिकांसाठी मूल्य साखळी भागीदार निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोयाबीन व भुईमूग या पिकांसाठी मूल्य साखळी भागीदार निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 सातारा द प्रतिनिधी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबिया सन २०२६-२७ अंतर्गत सोयाबीन व भुईमूग या पिकांसाठी मूल्य साखळी भागीदार (VCP) या क‍रिता इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी (FPC), सहकारी सस्था, सार्वजनिक किंवा खाजगी संस्था यांनी अर्ज करावेत. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सन २०२६-२७ अंतर्गत सोयाबीन व भुईमूग या पिकांसाठी सातारा जिल्ह्याची निवड केली आहे सदर योजनेअंतर्गत पीकनिहाय मूल्य साखळी भागीदार (VCP) यांचे मार्फत पूर्ण जिल्हा कार्यक्षेत्रात समूहामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतकरी शेतीशाळा इ. घटक राबवायचे आहेत. याकरिता खालील निकष पूर्ण करणारे शेतकरी उत्पादक कंपनी (FPCs) /सहकारी संस्था सार्वजनिक किंवा खाजगी संस्था यांची निवड करायची आहे.

मूल्य साखळी भागीदार VCP म्हणून निवड करावयाच्या FPC यांची पात्रता निकष :- कंपनी कायदा किंवा सहकारी कायदे अंतर्गत नोंदणी केलेली असावी. ज्या जिल्ह्यात समूह तयार झाला आहे तेथे काम करण्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा. म्हणजेच नोंदणी माहे मार्च २०२३ पूर्वीची असावी. किमान २०० शेतकरी सभासद हे शेतकरी उत्पादक कंपनी (FPCs) किंवा सहकारी संस्थेमध्ये नोंदणीकृत असावेत. सहकारी संस्था असल्यास संस्थेच्या उदिष्टामध्ये तेलबिया पिकात कामकाजाबाबत नमूद असावे. मागील ३ वर्षातील सरासरी वार्षिक उलाढाल ९ लाख रुपयापेक्षा जास्त असावी. शेतकरी उत्पादक कंपनी (FPCs) मध्ये शेतकऱ्यांचा किमान ३ लाख रुपयांचा समभाग असावा. शेतकरी उत्पादक कंपनी / सहकारी संस्था प्राधान्याने कमी उत्पादकता असणाऱ्या तालुक्यांमध्ये कार्यरत असावी. शासन अनुदानीत शेतकरी उत्पादक कंपनी / सहकारी संस्था यांना प्राधान्य दिले जाईल. १०००० शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या FPO राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM) आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) अंतर्गत स्थापन झालेल्या FPO, खाद्यतेल मूल्य साखळी संस्थाकडे नोंदणीकृत तेलबिया संबंधित FPO यांना प्राधान्य दिले जाईल.

सार्वजनिक किंवा खाजगी संस्था यांची पात्रता निकष :- किमान वार्षिक उलाढाल रु. १० कोटी. गेल्या ३ वर्षामध्ये कोणतेही कर चुकलेले नसावेत. बियाणे, खते, खादयतेलाचे उत्पादक म्हणून किमान ५ वर्षापासून काम केलेले तरी ज्या मूल्य साखळी भागीदार यांची निवड होईल यांना समुहामध्ये बियाणे वितरण आणि प्रशिक्षणावर झालेल्या एकूण खर्चाच्या १.५ % प्रमाणे व्यवस्थापन सहाय्य याबाबी अंतर्गत निधी देण्यात येईल. सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचनेच्या अधीन राहून वरील निकषांचे पूर्तता करणारे इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) /सहकारी संस्था, सार्वजनिक किंवा खाजगी संस्था यांनी सोयाबीन व भुईमूग या पिकांसाठी स्वतंत्रपणे निकषांच्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयास विहित नमुन्यात कंपनीच्या लेटर हेडवर व संचालक मंडळाच्या ठरावासह तातडीने अर्ज करण्यात यावा. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावावरील सर्व बाबींसाठीचे अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयामार्फत सादर करावेत. लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यासमार्गदर्शक सुचना मधील प्रपत्र अ व ब नुसार गुणांकन करुन निवड करणेत येईल, , असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी कळविले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाबाबत तज्ज्ञ समितीद्वारे सकारात्मक मार्ग काढणार –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली येथे विद्यार्थी विभागाचे ६५ वे राज्य कला प्रदर्शन – मंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीत रानहत्तींचा वावर: रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका; वनविभागाचे नागरिकांना आवाहन*

शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन शेतमाल मूल्यसाखळीचे बळकटीकरण करावे – पणन मंत्री जयकुमार रावल “मॅग्नेट“ची १८ व्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक

१० मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित; ३३८ जण संपर्कात प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश