vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठा आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय समितीची महत्त्वाची बैठक कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्र प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासह प्रलंबित प्रश्नांवर होणार सविस्तर चर्चा

मराठा आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय समितीची महत्त्वाची बैठक-कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्र प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासह प्रलंबित प्रश्नांवर होणार सविस्तर चर्चा…

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी: मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी व अडचणींचे निराकरण, प्रलंबित प्रश्नांचा निपटारा तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या, दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत क्षेत्रीय स्तरावरील विविध बाबींचा सखोल आढावा घेऊन पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज येथे दिली.

आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मराठा आरक्षणासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील, विभागातील सातही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक तसेच सर्व उपविभागीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आमदार प्रसाद लाड, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी विनय गौडा, जालना जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार, जालना पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, सहआयुक्त मंजुषा मिसकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.बैठकीत मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीसह इतर संलग्न बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला. क्षेत्रीय स्तरावरील विविध बाबी, उपलब्ध माहिती, नोंदी तसेच संबंधित प्रक्रियेतील अडचणी याबाबतही चर्चा करण्यात आली.

दि. ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीस मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, आमदार प्रसाद लाड, समितीचे सदस्य, विभागातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलीस अधीक्षक तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि सर्व जिल्ह्यांतील जात पडताळणी समित्यांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीचा आढावा, त्यातील त्रुटी व अडचणींचे निराकरण, प्रलंबित प्रश्नांचा निपटारा तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर व्यापक चर्चा होण्यासाठी या विषयाचा अभ्यास असलेले अभ्यासक तसेच आंदोलनाशी संबंधित अभ्यासकांनी बैठकीत सहभागी होऊन समितीसमोर आपली भूमिका व सूचना मांडाव्यात, असे आवाहन उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले आहे.

 

००००

संबंधित पोस्ट

भारत निवडणूक आयोगाच्या ‘ईसीआयनेट’ डिजिटल प्लॅटफॉर्मचे 

vishwatmaklokswamivarta

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती देणार- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जालना येथे फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पाच वर्षाखालील बालकांना पाजण्यात आला पोलिओचा डोस

क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ

सार्वजनिक बांधकाम विभाग-भंडारा ते गडचिरोली ९४ किलोमीटरचा द्रुतगती महामार्गभूसंपादनासह अनुषंगिक ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता

vishwatmaklokswamivarta