vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उन्हाळी हंगामासाठी पाणी मागणीचे अर्ज २४ मार्चपर्यंत सादर करावेत

उन्हाळी हंगामासाठी पाणी मागणीचे अर्ज २४ मार्चपर्यंत सादर करावेत

 

​अहिल्यानगर, प्रतिनिधी : नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध धरणे व कालव्यांमधून उन्हाळी हंगाम सन २०२५-२६ साठी उभी हंगामी चारा पिके, ऊस व फळबागांसारख्या बारमाही पिकांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पाण्याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांनी व पाणी वापर संस्थांनी नमुना क्रमांक ७ वरील अर्ज संबंधित सिंचन शाखा कार्यालयात दि. २४ मार्च २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सो. अ. शहाणे यांनी केले आहे. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

हा पाणीपुरवठा गोदावरी उजवा व डावा तट कालवा, गंगापूर डावा तट कालवा, आळंदी उजवा व डावा तट कालवा तसेच पालखेड उजवा तट कालवा यांच्या लाभक्षेत्रात करण्यात येईल. याशिवाय दारणा, गंगापूर, मुकणे, भावली, वाकी, भाम, कडवा, वालदेवी, गौतमी-गोदावरी, काश्यपी व आळंदी आदी धरणांच्या जलाशयांवरून; तसेच दारणा, गोदावरी, कडवा व आळंदी नद्यांच्या पात्रातून आणि गोदावरी नदीवरील विभागाच्या अधिपत्याखालील एकूण १० कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या ठिकाणावरून प्रवाही व उपसा सिंचनाद्वारे हे पाणी दिले जाईल.

धरणांमधील उपलब्ध पाण्यातून प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाईल आणि उर्वरित पाण्यातून शेतीसाठी कालव्यांच्या आवर्तनानुसार पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच ठिबक व तुषार यांसारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहनही विभागाने केले आहे

0000

संबंधित पोस्ट

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक बसविण्याचे आवाहन

जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

नदीजोड प्रकल्पांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा-नदीजोड प्रकल्पातील कामे कालमर्यादा ठरवून करावीत- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करूनदेण्यासाठी ‘शक्ती ऑन व्हील्स’ उपक्रम महत्त्वपूर्ण- मंत्री आदिती तटकरे• सचिवालय जिमखाना येथे ‘शक्ती ऑन व्हील्स’ प्रदर्शनी व विक्री व्हॅनचे उद्घाटन• नोकरदार महिलांना दर्जेदार खाद्यपदार्थ व घरगुती वस्तू सहज उपलब्ध होणार

प्रशासन गाँव की ओर’ मोहीम प्रभावीपणे राबवावी  — जिल्हाधिकारी किशन जावळे 

vishwatmaklokswamivarta

पहलगाम घटना; राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात-दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती