
चाकण एमआयडीसीतील रस्ते व पायाभूत सुविधांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी,रस्ते, वाहतूक, पावसाच्या पाण्याचा निचरा, अतिक्रमणे व पार्किंगच्या प्रश्नांचा घेतला आढावा; कालबद्ध उपाययोजनांच्या सूचना..
पुणे, प्रतिनिधी : चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी, पावसाच्या पाण्याचा निचरा, अतिक्रमणे, पार्किंग तसेच अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. पाहणीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चाकण औद्योगिक वसाहतीतील विविध समस्या आणि त्यावर करावयाच्या कालबद्ध उपाययोजनांचे सविस्तर सादरीकरण केले. संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून तातडीच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात तसेच भविष्यातील औद्योगिक विस्तार आणि वाढती वाहतूक लक्षात घेऊन दीर्घकालीन व शाश्वत उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी दिल्या.



