vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या तैलचित्ररूपी स्मारकाचे* *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण*

*लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या तैलचित्ररूपी स्मारकाचे*
*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण*

सातारा प्रतिनिधी:- ग्रामीण जनतेचे कैवारी आणि सहकार महर्षी म्हणून ओळखले जाणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या सातारा येथील पोवई नाका परिसरातील तैलचित्ररूपी स्मारकाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्य प्राणालीद्वारे उत्साही वातावरणात लोकार्पण करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, सातारा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरम यशराज देसाई, उपननगराध्यक्ष डी.जी. बनकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोवई नाका या सातारच्या मध्यवर्ती ठिकाणी साकारण्यात आलेले हे तैलचित्ररूपी स्मारक बाळासाहेब देसाई यांच्या उत्तुंग कर्तृत्वाची आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सहकार अन् सामाजिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाची साक्ष देते. ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि सहकार क्षेत्राला दिलेली दिशा आहे. त्यांनी महाराष्ट्रात रस्ते पुलांचे जाळे निर्माण केले. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत, शिक्षण संस्थांचा विस्तार व्हावा आणि सामान्य कुटुंबातील मुलांना पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. लोकेनेते बाळासाहेब हे दूरदर्शी नेते होते त्यांनी संसदीय लोकशाहीचा पाया रचला. त्यांचे स्मारक युवा पिढीला ऊर्जा, प्ररेणा देणारे ठरले, असाही विश्वास उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्मारकाची उभारणी केली असून हे स्मारक सातारा शहराच्या सौंदर्यात भर पडली असून, हे स्मारक येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला बाळासाहेबांच्या विचारांची आठवण करून देईल, असेही त्यांनी सांगितले.
0000

संबंधित पोस्ट

अंबादेवी, एकविरादेवी परिसराच्या विकासाला गती द्यावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*श्री रूख्मिणी विदर्भपीठाचा आराखडा सादर

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत ड्रोन व सीसीटीव्ही दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरातील भूस्खलन, पूरस्थिती; महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, हर्षीलमधील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट—-राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

आरफळ कालवा उन्हाळी आवर्तनास 15 मे पर्यंत मुदतवाढपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतल्याने लाभधारकांना दिलासा..

अनाथ मुलींमध्ये रमल्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे,सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत ‘आपुलकीचा संवाद’

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपाचं चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल – मुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta