vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आरफळ कालवा उन्हाळी आवर्तनास 15 मे पर्यंत मुदतवाढपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतल्याने लाभधारकांना दिलासा..

आरफळ कालवा उन्हाळी आवर्तनास 15 मे पर्यंत मुदतवाढपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतल्याने लाभधारकांना दिलासा..

 

 सांगली, प्रतिनिधी: आरफळ कालव्याच्या सध्या सुरु असणाऱ्या सन 2024-25 मधील उन्हाळी हंगाम पाण्याच्या आवर्तनास 15 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
 आरफळ कालव्याचे उन्हाळी हंगाम पाण्याचे आवर्तन 11 मे रोजी संपणार होते. तथापि, आरफळ कालव्याच्या शेवटच्या भागातील व विसापूर-पुणदी योजनेच्या लाभक्षेत्रामधील लाभधारकांची या संदर्भातील मागणी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तातडीने निदर्शनास आणून दिली व साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी याबाबत समन्वय ठेवला.
 पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही याची तात्काळ दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी उन्हाळी आवर्तन सुरु ठेवण्याबाबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली. तसेच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी समन्वय ठेवला.
 या चर्चेच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले तसेच तारळी व आरफळ प्रकल्पाचे क्षेत्रीय अधिकारी यांना तारळी प्रकल्पातून सांगली जिल्ह्याकरिता आरफळ कालव्यामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्याबाबत सूचना दिल्या. अशा प्रकारे 15 मे पर्यंत उर्वरित 0.11 टीएमसी ऐवजी 0.21 टीएमसी पाणी विसापूर-पुणदीच्या उर्वरित भागास उपलब्ध होणार आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मार्चमध्ये झालेल्या कालवा सल्लागार समितीची बैठकीत सांगली जिल्ह्याकरिता तारळी प्रकल्पातून कोपर्डी लिंकद्वारे उन्हाळी हंगामासाठी 0.99 टीएमसी एवढी तरतूद करण्यात आली होती व सांगली जिल्ह्याकरिता आरफळ कालव्याचे आवर्तन दि. 26 मार्च पासून सुरु करण्यात आले. उन्हाळी हंगामाकरिता अनुज्ञेय 0.99 टीएमसी पैकी 0.88 टीएमसी पाणी 11 मे पर्यंत वापरण्यात आले. आरफळ कालव्याचे सध्या सुरु असणारे सन 2024-25 मधील उन्हाळी हंगाम पाण्याचे आवर्तन 11 मे रोजी संपणार होते. त्यामुळे लाभधारकांकडून उन्हाळी आवर्तन सुरु ठेवावे अशी मागणी होत होती. त्या पार्श्वभूमिवर 15 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने सांगली जिल्ह्यातील आरफळ कालवा व विसापूर-पुणदीच्या लाभधारकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

०००००

संबंधित पोस्ट

दापूर माळ विकासकामांना प्रत्यक्ष प्रारंभ; रस्ते, घरकुल, पाणीपुरवठा व शाळा बांधकामाला गती

राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम,निवडणूक प्रक्रियेतील यश सामुहिकप्रयत्नांमुळेच- विभागीय आयुक्त दिलीप गावडे

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 28.73 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 21824 क्युसेक्स तर वारणा धरणातून 11960 क्युसेक्स विसर्ग सुरू

राज्यातल्या २३ नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान.

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान 8 नोव्हेंबर रोजी वाराणसीला भेट देऊन 4 नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार नवीन वंदे भारत गाड्या प्रवासाचा वेळ वाचवत प्रादेशिक गतिशीलता वाढवून अनेक राज्यांमध्ये पर्यटन आणि व्यापाराला चालना देणार

vishwatmaklokswamivarta

कृपया प्रसिद्धीसाठी-हिंदु जनजागृती समितीची मुंबई सहपोलीस आयुक्तांकडे तक्रार खोट्या तक्रारी करून हिंदूंना जाणीवपूर्वक त्रास देणार्‍या तिस्ता सेटलवाड आणि ‘सी.जे.पी.’ संस्थेवर कारवाई करा !

vishwatmaklokswamivarta