vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम,निवडणूक प्रक्रियेतील यश सामुहिकप्रयत्नांमुळेच- विभागीय आयुक्त दिलीप गावडे

राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम,निवडणूक प्रक्रियेतील यश सामुहिकप्रयत्नांमुळेच- विभागीय आयुक्त दिलीप गावडे

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – सन २०२४ चे निवडणुकांचे वर्ष होते. या एकाच वर्षात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्या. निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी सर्व विभागांचा समन्वय सहकार्य आवश्यक असते, ते एक सामुहिक कार्य असून त्यातील प्रत्येकाचे योगदान हे सारखेच मोलाचे आहे,असे प्रतिपादन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी  येथे केले

राष्ट्रीय मतदार दिन (दि.२५ जानेवारी) कार्यक्रमाचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनीयार, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहा, निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सगळ्यांना मान्यवरांच्या हस्ते १४५ जणांना सन्मानपूर्वक प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले. त्यानंतर हर्सूल गाव येथील मनपा केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. तसेच निवडणूक कालावधीत मतदार जनजागृतीचा भाग म्हणून घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, नाटक स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच नव्याने मतदार नोंदणी केलेल्या युवा मतदारांना मतदार ओळखपत्रही वाटप करण्यात आले.

मनपा आयुक्त जी.श्रीकांत यांनी निवडणूक प्रक्रियेत सगळ्या विभागांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख करुन सांगितले की, निवडणूक प्रक्रिया राबविणे हे प्रशासकीय कौशल्याचे काम आहे. सर्व नियम व कायद्यांचा अभ्यास करुन त्याची योग्य अंमलबजावणी करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी सर्व विभागांचा एकमेकांशी संवाद व समन्वय आवश्यक असतो.प्रास्ताविक देवेंद्र कटके यांनी तर सुत्रसंचालन डॉ. मीरा ढास यांनी केले.०००००

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाकरिता मिनी ट्रॅक्टरसाठी-स्वयंसहाय्यता बचत गटांना 31 मे पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

भारतीय निवडणूक आयोगाच्या मते, बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६७.१४% मतदान झाले.

vishwatmaklokswamivarta

बळीराजाच्या कल्याणासाठी शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही एकत्रित पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हिरकणी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

23 नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा राज्यभरातील 4 लाख 75 हजार 669 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ

vishwatmaklokswamivarta

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण बैठकविद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये जीपीएस,सीसीटीव्ही कॅमेरे,पॅनिक बटन सुविधा बंधनकारक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी