vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पं. चंद्रकांत लिमये यांना आदरांजली अर्पण करणारा कार्यक्रम १७ जुलै रोजी पु.ल कट्ट्यावर

पं. चंद्रकांत लिमये यांना आदरांजली अर्पण करणारा कार्यक्रम १७ जुलै रोजी पु.ल कट्ट्यावर

मुंबई, प्रतिनिधी डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ शास्त्रीय गायक व अभिनेते पंडित चंद्रकांत लिमये यांना आदरांजली अर्पण करणारा कार्यक्रम शुक्रवार, १७ जुलै रोजी पु. ल कट्ट्यावर आयोजित करण्यात आला आहे. नवीन लघु नाट्यगृह, रवींद्र नाट्य मंदिरच्या मागच्या बाजूला, पाचवा मजला येथे सायंकाळी सहा वाजता ही स्वरांजली अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका फैय्याज तसेच पं. राजा काळे, पंडित चंद्रकांत लिमये यांचे कुटुंबीय व इतर मान्यवर पंडितजींच्या आठवणी जागवतील. पं. मुकुंद मराठे, मकरंद कुंडले, अतुल ताडे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पं. चंद्रकांत लिमये यांच्या गुरुकुलातील काही शिष्यांचेही गायन या कार्यक्रमात होणार आहे. तसेच पंडितजींचे काही दुर्मिळ ऑडिओ व व्हिडिओ देखील रसिकांना ऐकायला व पहायला मिळतील.

 

हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे . शास्त्रीय व नाट्य संगीताच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या या कलावंताला आदरांजली वाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व वसंतराव देशपांडे संगीत सभा, मुंबई या दोन्ही संस्थांकडून करण्यात येत आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

गडचिरोली जिल्हा रुग्णालयाची मोठी कामगिरी! दोन गुंतागुंतीच्या ओव्हेरियन ट्युमर शस्त्रक्रिया यशस्वी! 

नारी शक्ती वंदन’ हे विधेयक देशाच्या सर्वांगिण विकासाला हातभार लावेल – खासदार नरेश म्हस्के ‘ नारी शक्ती वंदन’ विधेयकाला शिवसेना पक्षाचा पाठिंबा

महाराष्ट्रातील कारागृह ग्रंथालयांसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्याकडून बुककेस आणि बुकरॅक देण्याचा निर्णय कारागृहातील वाचनसंस्कृतीस चालना; बंदिवानांसाठी वाचनाची नवी संधी

नागरिकांना उष्मालाटेपासून बचावासाठी दक्षता घेण्याचे आवाहन

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली,राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

जयपूर डायलॉग’ हा राष्ट्रीय विचारांचा मंच- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जयपूर डायलॉग डेक्कन समिट

vishwatmaklokswamivarta