vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जयपूर डायलॉग’ हा राष्ट्रीय विचारांचा मंच- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जयपूर डायलॉग डेक्कन समिट

जयपूर डायलॉग’ हा राष्ट्रीय विचारांचा मंच- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जयपूर डायलॉग डेक्कन समिट

 

राज्य प्रतिनिधी : जयपूर डायलॉगने राष्ट्रीय विचारांना एक व्यापक मंच उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. तसेच इतिहास आणि संस्कृती नव्या पिढीसमोर आणण्याचे कार्यही या माध्यमातून केले जात आहे. जयपूर डायलॉगच्या चांगल्या कार्यासाठी शासन कायम पाठीशी राहिल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हॉटेल हयात येथे आयोजित महाराष्ट्रातील पहिल्या ‘जयपूर डायलॉग’च्या डेक्कन समिट कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि जयपूर डायलॉगचे प्रमुख संजय दीक्षित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

 फडणवीस म्हणाले, प्रसारमाध्यमांनी सर्जनशील राहून काम करणे आवश्यक आहे. जलदगतीने बातमी देत असताना माहितीच्या मुळाशी जाण्याची, खात्री करून घेण्याची, शोध घेण्याची, नवनवीन विषय हाताळण्याची वृत्ती आणि गांभीर्य माध्यमांनी जपले पाहिजे. महाराष्ट्रातील नव मतदारांच्या संख्ये संदर्भात ते म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रामध्ये व्यापक मतदार जनजागृती अभियान घेऊन मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली. याआधी फक्त १ जानेवारी रोजी १८ वर्षे पूर्ण झालेल्या उमेदवाराला मतदार यादीत नाव नोंदणी करता येत होती. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार १ जानेवारी, १ एप्रिल, १ जून व १ सप्टेंबर रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवा मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली असेही त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

९ वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण०३ एसीएम पदावरील वरिष्ठ माओवाद्यांसह ०६ सदस्यांचा समावेश*एके-४७ व कार्बाईनसह आत्मसमर्पण; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त*

तेल उद्योग कंपन्याचे संरक्षण क्षमता महोत्सवातून जनजागृती अभियान

vishwatmaklokswamivarta

ओबीसींच्या सर्वसमावेशक विकासावर शासनाचा भर – इतर मागास बहुजन विकास मंत्री अतुल सावे • रोजगार मिळविण्यापेक्षा रोजगार देणारे व्हा• नांदेडमध्ये ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा’ उत्साहात ..

vishwatmaklokswamivarta

नववर्ष महाराष्ट्रासाठी विकासाच्या नव्या संधी घेऊन येईल -उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा

राज्यातील सर्व पुल व साकवांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचाअहवाल तातडीने सादर करावा- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,राज्यातील पुल, साकव आणि सार्वजनिक इमारतींचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आढावा