vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आरोग्य सेवक (पुरुष) पदावरून ११ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर पदोन्नती; मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते आदेश वितरण

आरोग्य सेवक (पुरुष) पदावरून ११ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर पदोन्नती; मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते आदेश वितरण

 

ठाणे, प्रतिनिधी: जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आरोग्य विभागातील आरोग्य सेवक (पुरुष) या पदावरील ११ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर पदोन्नती देऊन समुपदेशनानंतर पदस्थापना आदेशांचे वितरण आज, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “अधिक जबाबदारीने सेवा करण्याची संधी आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, तत्पर आणि संवेदनशील आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकाने आपल्या नव्या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेला अधिक सक्षम बनविण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने कार्य करावे.”

पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त करत जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले. नव्या जबाबदारीचे भान ठेवून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

०००

संबंधित पोस्ट

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

नगरपरिषद निवडणुकीमुळे शेगाव येथील मंगळवारचा आठवडी बाजार रद्द…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखालीमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये सुधारणा संदर्भात बैठक.. 

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांच्या उपस्थितीत नॅबचा ७४ वा स्थापना दैनंदिन साजरा-अधिकाधिक लोकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प करावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

विनापरवाना ड्रोन उडवणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल – नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन