vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत अतिधोकादायक इमारत कोसळली; दुकानदार ढिगाऱ्याखाली अडकला, सुदैवाने बचावला

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत अतिधोकादायक इमारत कोसळली; दुकानदार ढिगाऱ्याखाली अडकला, सुदैवाने बचावला

ठाणे प्रतिनिधी –

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी – भिवंडी शहरातील आजमी नगर – हाफिज नगर परिसरात  एक जुनी इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. चाळीस वर्षांपूर्वी बांधलेली ही एकमजली इमारत अतिधोकादायक श्रेणीत मोडत होती. या दुर्घटनेत तळमजल्यावर असलेल्या किराणा दुकानाचा काही भाग कोसळल्याने दुकानदार ढिगाऱ्याखाली अडकला होता. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

म प्राप्त माहितीनुसार, इमारतीच्या तळमजल्यावर किराणा दुकान तर वरच्या मजल्यावर काही रहिवासी राहत होते. सुदैवाने घटनेच्या वेळी वरच्या मजल्यावर कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच भिवंडी महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल व स्थानिक पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, इमारतीच्या आजूबाजूचा परिसर खबरदारी म्हणून रिकामा करण्यात आला आहे.दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीला अतिधोकादायक घोषित केल्यानंतरही ती रिकामी करण्यात आली नव्हती, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. महापालिकेकडून सध्या इमारत पूर्णतः निष्काषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नशिबाने मोठी दुर्घटना टळल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून, जुन्या व अतिधोकादायक इमारतींच्या तपासणीची मागणी स्थानिकांनी केली आहे.

 

संबंधित पोस्ट

द्वारका, दिल्ली | मोहन गार्डन परिसरात मोठी दुर्घटना टळली

vishwatmaklokswamivarta

सिडको वाळूज ग्रोथ सेंटर जमीन संपादनासाठी टीडीआर व सर्वसमावेशक आरक्षणाचा पर्याय – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

पुर्णा मध्यम प्रकल्प ‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी सात पाणीपाळ्या प्रस्तावितशेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्हा (तालुकानिहाय पावसाची नोंद) दि. २२.०५.२०२५ सकाळी ८:३० वाजेपर्यंत..

vishwatmaklokswamivarta

अड. देसाई क्रिडांगणात कै. महेश मोरे यांच्या स्मरणार्थ क्रिकेट टुर्नामेंट संपन्न

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यातील तीनही नगरपरिषदांसाठी शांततेत मतदान,उदगीर नगरपरिषद निवडणुकीत 68.12 टक्के, अहमदपूरमध्ये 73.06 आणि औसा नगरपरिषदमध्ये 75.73 टक्के मतदान…

vishwatmaklokswamivarta