vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

एल्डर लाईन” 14567– ज्येष्ठांसाठी मदतीचा आधार

एल्डर लाईन” 14567– ज्येष्ठांसाठी मदतीचा आधार

ठाणे, प्रतिनिधी- सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने जेष्ठ नागरिकांसाठी 14567 राट्रीय हेल्पलाईन ही सेवा देशभरातील सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात वयोवृद्धांसाठी सुरू करण्यात आली आहे. जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्यामार्फत ही सेवा महाराष्ट्रात राबवली जाते. “मानवसेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रीद वाक्य घेऊन संस्थापक अध्यक्ष डॉ.विनोद शहा (MD) यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फाऊंडेशन, पुणे गेल्या 37 वर्षापासून सातत्याने आपल्या विविध प्रकल्पांद्वारे गरीब, आजारी, वृद्ध, अपंग, निराधार, गरीब मुले मुली आणि महिला यांची सेवा करीत आहेत. जनसेवा फाउंडेशनला सयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष दर्जा प्राप्त आहे.

महाराष्ट्रातील अंमलबजावणी: ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेल्या या 14567 राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईनवर आतापर्यंत 4 लाखांहून अधिक कॉल्स आले असून 30 हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे

हेल्पलाइनद्वारे मिळणाऱ्या मोफत प्रमुख सेवा:• माहिती: आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृह व वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, याबाबत माहिती.• मार्गदर्शन: कायदेविषयक, मालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत कायदेशीर सल्ला, पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007.• भावनिक आधार – मानसिक आजार व चिंता, ताण, राग इत्यादी व्यवस्थापन.• बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांसाठी मदत आणि पुनर्वसन, कुटुंबीयांशी संवाद, पोलिस प्रशासनाशी समन्वय, समुपदेशन.“एल्डर लाईन 14567” ही केवळ हेल्पलाईन नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात, एक सुरक्षित आधार आहे. या माध्यमातून वयोवृद्धांच्या गरजा समजून घेतल्या जातात आणि त्यांना सन्मानाने जगता येईल यासाठी आवश्यक ती मदत दिली जाते. ज्येष्ठांसाठीची ही सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील प्रत्येकाने जागरूक व्हावे आणि सर्व गरजू वयोवृद्धांनी या एल्डर लाईनचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000–

संबंधित पोस्ट

फुलांची होळी – पर्यावरणपूरक सण साजरी- 🌸 मुंबईचे महापौर श्रीमती रितू तावडे

आजपासून (दि.९) तीन दिवस दुर्मिळ वाद्यमहोत्सव

vishwatmaklokswamivarta

लघु उद्योजकांनी “जिल्हा पुरस्कार 2024-25” करितादि.10 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत

मलकापूर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत…

मेळघाटातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत आहेत शासनाच्या योजना,धारणी तहसील कार्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन,शासन आपल्या दारी संकल्पना साकार; धुळघाटरोड येथे महसूल समाधान शिबिर

vishwatmaklokswamivarta

मनोज जरांगे पाटील यांना-मुंबई सीएसटीतील  आझाद मैदान रिकामं करण्याचा आदेश; आंदोलनाला नवा ट्विस्ट

vishwatmaklokswamivarta