vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नागरिकांना पारदर्शक आणि गतिमान सेवा देणे, हे प्रशासनाचे ध्येय -जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ,ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा हक्क दिन’ मोठ्या उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

नागरिकांना पारदर्शक आणि गतिमान सेवा देणे, हे प्रशासनाचे ध्येय -जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ,ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा हक्क दिन’ मोठ्या उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

     ठाणे,द प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दरवर्षी २८ एप्रिल हा दिवस ‘सेवा हक्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 यावेळी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांच्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला    क्यूआर कोडद्वारे सेवांची माहिती आता अधिक सुलभ..   याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या हस्ते विशेष ‘क्यूआर कोड’चे अनावरण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व ३७ विभागांनी आपापल्या कार्यालयांच्या दर्शनी भागात हे क्यूआर कोड लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. विशेषतः महसूल विभागाच्या सर्व सेतू केंद्रांवर आणि तहसील कार्यालयांत हे कोड उपलब्ध होतील, ज्यामुळे सर्वसामान्यांना आवश्यक कागदपत्रे आणि आपल्या हक्काच्या सेवांची माहिती एका क्लिकवर सहज उपलब्ध होईल.    प्रशासकीय कामगिरीचा उंचावणारा आलेख..   १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षातील कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रशासनाने ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना कालबद्ध सेवा देण्यात मोठे यश मिळविले आहे. महसूल आणि इतर विभागांतील अर्जांच्या निकालाची टक्केवारी ९५.१३ इतकी राहिली असून, हा आलेख यापुढेही असाच उंचावत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा मिळणे हाच नागरिकांचा हक्क असून त्यासाठी प्रशासनाने सदैव जागृत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.   कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान.    जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, गृह विभागाच्या उपआयुक्त (विशेष शाखा) श्रीमती मकवाना, कामगार उपायुक्त संभाजी वन्हाळकर यांचा समावेश होता. तसेच भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप, ठाण्याचे तहसिलदार उमेश पाटील, नायब तहसिलदार सत्यजित चव्हाण, दत्तात्रेय बर्डे यांच्यासह अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी आणि शहापूर तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.   आदर्श आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत ) यांचा सत्कार..   ग्रामपंचायत अंजूर ता.भिवंडी, ग्रामपंचायत सोनाळे ता.भिवंडी, ग्रामपंचायत चेरपोली ता.शहापूर यांनाही त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.    या कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, शशिकांत गायकवाड, वरूणकुमार सहारे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, तहसिलदार सचिन चौधर, संदीप थोरात यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसिलदार संदीप थोरात यांनी केले.

0000

संबंधित पोस्ट

निवासी अतिक्रमणांचे नियमानुकूलन; महसूल कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण …

लंडन मधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

ठाकरे बंधूची युती सत्ता , स्वार्थ आणि अस्तित्वासाठी असून कोणाच्याही युती किंवा आघाडी झाल्या तरी महायुती भक्कम आहे – शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

vishwatmaklokswamivarta

राज्य महिला व बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे तालुकास्तरीय केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्यायिक मागण्या साठी क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मागण्यांसाठी मोर्चा…

नव्या सर्वसमावेशक धोरणामुळे गृहनिर्माणात क्रांती येणार सर्वसामान्य, दुर्बलांचे घराचे स्वप्न सहज साकारणार राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार..- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जागतिक महिला दिन नवी मुंबईत उत्साहात साजरा*