vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सातारा जिल्हा रुग्णालयातील एमआरआय, कॅथलॅब सेवांचे तातडीने लोकार्पण करा-मंत्री प्रकाश आबिटकर

सातारा जिल्हा रुग्णालयातील एमआरआय, कॅथलॅब सेवांचे तातडीने लोकार्पण करा-मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रिक्त पद भरतीसह, एमआरआय व कॅथलॅब सेवांचे तातडीने लोकार्पण करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

मंत्रालयात मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त रुग्णालये व आरोग्य संस्थांतील विकासकामे, मनुष्यबळ, वैद्यकीय सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक संजय काटकर, सहसंचालक (रुग्णालय) डॉ. सुनिता गोल्हाईत, पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार, उपसचिव दीपक केंद्रे, सातारा जिल्हा शल्य चिकित्सक; तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री आबिटकर यांनी सातारा जिल्हा रुग्णालयातील एमआरआय व कॅथलॅब सुविधा तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले. राज्यातील आरोग्य सेवेला अधिक बळकटी देण्यासाठी सुमारे १,४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांची ऑगस्ट महिन्यात रिक्त पदांवर नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या नियुक्त्यांमुळे शासकीय रुग्णालयांमधील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबवून अधिकाधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळेल, यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी करावी. आरोग्य सेवा आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी देऊन विकास कामांची वस्तुस्थिती तपासावी आणि त्याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे निर्देशही आरोग्य मंत्री श्री आबिटकर यांनी दिले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सातारा जिल्हा रुग्णालयातील एमआरआय, कॅथलॅब आणि आयुष रुग्णालयाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून नागरिकांना आधुनिक, दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश दिले.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही राज्य शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून, सातारा जिल्ह्यातील सर्व प्रलंबित आरोग्यविषयक विकास कामे गतीने पूर्ण करावीत.

 

0000

 

संबंधित पोस्ट

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश

कृत्रिम वाळू प्रकल्पांना सवलती देऊन प्रोत्साहन*जिल्ह्यात कृत्रिम वाळू निर्मितीला चालना*जिल्हाधिकाऱ्यांचे उद्योजकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा सरळसेवा पदभरती परीक्षेच्या पहिल्या दिवशी 6 जिल्हयातील 13 केंद्रांवर परीक्षा प्रक्रीया सुव्यस्थित संपन्न

पुनर्विकासातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत – विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर

vishwatmaklokswamivarta

नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात,अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन!देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या!- हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

नवी मुंबईतील अभिनव वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पाची महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी केली पाहणी