vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुनर्विकासातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत – विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर

पुनर्विकासातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत – विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर

मुंबई, प्रतिनिधी : मुंबईतील जुन्या इमारती, चाळी तसेच पुनर्विकास प्रकल्पांतील रहिवाशांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी दिले.

विधानभवनातील दालनात मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बैठकीत कलशेटकर कंपाउंड येथील ९५ वर्षे जुन्या ‘रामदास मंडळा’स पुनर्विकसित इमारतीमध्ये योग्य जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच हररवाला बिल्डिंग क्र. १८ व १९ मधील रहिवाशांना पुनर्विकासादरम्यान देण्यात येणाऱ्या भाड्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेण्यात आलायाशिवाय यदुवंशी अहिर ग्वाल सकल पंच, कृष्ण छाया (दुरुस्ती इमारत), खिमजी नाणजी कोठारी चाळ, अयोध्या सोसायटी तसेच वॉर्डन वकील चाळ येथील रहिवाशांच्या विविध समस्या आणि तक्रारींवरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पुनर्विकास प्रक्रियेत मूळ रहिवासी किंवा स्थानिक संस्थांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची दक्षता घेऊन प्राप्त तक्रारींवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी. तसेच पात्र रहिवाशांना लवकरात लवकर दिलासा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपसभापती सचिन अहिर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

संबंधित पोस्ट

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार-2023-24 प्राथमिक छाननी अहवालात,केलेल्या पुरस्कार गुणांकनाबाबत आक्षेप किंवा सूचना 18 फेब्रुवारी पर्यंत सादर कराव्यात

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका*प्रसिध्दीकरिता- ‘टेक वारी’तील ज्ञानाचा नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी घेत आहेत ऑनलाईन लाभ

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार

सायबर फसवणूक झाल्यास विनाविलंब तक्रार द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायबर फसवणूक तक्रारीसाठी ‘गोल्डन अवर’ महत्वाचा

vishwatmaklokswamivarta

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक- केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री श्रीपाद नाईक,केंद्र शासनाकडून वित्त पुरवठा व्याजदर कमी असावेत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

अद्यापही ऊसदर जाहीर न केलेल्या कारखान्यांनी त्वरित दर जाहीर करावा**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta