vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार-2023-24 प्राथमिक छाननी अहवालात,केलेल्या पुरस्कार गुणांकनाबाबत आक्षेप किंवा सूचना 18 फेब्रुवारी पर्यंत सादर कराव्यात

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार-2023-24 प्राथमिक छाननी अहवालात,केलेल्या पुरस्कार गुणांकनाबाबत आक्षेप किंवा सूचना 18 फेब्रुवारी पर्यंत सादर कराव्यात

 

     ठाणे, प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार” प्रदान करण्यात येतो.

   क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जेष्ठ क्रीडा महर्षींकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

 शासनाने दि.29 डिसेंबर 2023 व दि.25 जानेवारी 2024 अन्वये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली, 2023 विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू/व्यक्ती यांच्याद्वारे दि.14 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत ऑनलाईन पदधतीने प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक छाननी करण्यात आलेली असून, प्राथमिक छाननीचे गुणांकन तक्ते शासन निर्णय क्र.शिछपु.202३/ प्र.क्र.188/क्रीयुसे-2 दि. 29 डिसेंबर, २०2३मधील नियम क्र. 1.19, नियम क्र. 1.20 नियम क्र. 1.21 अन्वये एकूण गुणांकनासह दि.15 ते 18 फेब्रुवारी, 2025 (सायं 05.00 पर्यंत) या कालावधीत सूचना व हरकतीसाठी https://shivchhtrapatiawards.com या लिंकवर प्रसिदध करण्यात आले आहेत.

   हे प्राथमिक छाननी अहवाल अंतिम नसून, त्यामध्ये आपल्या सूचना व हरकतींनुसार बदल होऊ शकतो, तसेच सूचना/हरकतींनंतर हा अहवाल पुनश्च प्रसिदध करण्यात येणार नाही.

प्राथमिक छाननी अहवालात केलेल्या पुरस्कार गुणांकनाबाबत काही आक्षेप किंवा सूचना असतील तर त्या सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यात सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

जवखेडा येथील शेतकरी महिलेला तात्काळ नुकसान भरपाई द्या- शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन..

कांदळवनाचे संरक्षण करणाऱ्यांसाठी बक्षीस योजना राबविणार – वनमंत्री गणेश नाईक

पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले; मुंबईतील मुलुंड रेल्वे स्टेशनवर गंभीर प्रकार

घरकुलाच्या मागणीसाठी दिव्यांगांचा-महानगरपालिकेवर धडक मोर्चा  

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे हरभरा नोंदणीस १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ !आ.मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या पाठपुराव्याला मिळाले यश,

स्वामित्व योजनेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सनद वितरणाचा शुभारंभ—महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांच्या हस्ते सनद वितरण..

vishwatmaklokswamivarta