vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

घरकुलाच्या मागणीसाठी दिव्यांगांचा-महानगरपालिकेवर धडक मोर्चा  

घरकुलाच्या मागणीसाठी दिव्यांगांचा-महानगरपालिकेवर धडक मोर्चा

जालना प्रतिनिधी- घरकुल देण्यात यावे तसेच कर निर्धारक रामेश्वर घोळवे यांची बदली रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने  जालना महानगर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

  सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे, सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे ,लक्ष्मी भुतडा,संगीता झाडीवाले, सतिश वाघ , तसेच मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.   मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हा मोर्चा महानगर पालिकेवर धडकला. यावेळी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने महानगर पालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात महानगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांना घरकुल द्यावे, जालना महानगरपालिकेचे दिव्यांग विभागाचे अधीक्षक रामेश्वर घोळवे यांची बदली रद्द करण्यात यावी,मधुबन कॉलनी किंवा मस्तगड येथे दिव्यांगासाठी पुनर्वसन केंद्रासाठी जागा उपलब्ध करावी, गांधी चमन ते रेल्वे स्थानक आठवडी बाजारासाठी दिव्यांगांना राखीव जागा द्यावी, मागील वर्षी 180 दिव्यांगाचे पाच टक्के निधी थकलेला निधी दिव्यांगाच्या खात्यात जमा करावा आदी मागण्यांचा समावेश आहे

 या मोर्चात सविता बोराडे ,पुजा मेड, अशोक मंत्री, शोभा देशमुख ,राजेश कावेटी, शेख साबेर, संतोष गवटे ,शेख आसलम, शेख मतीन, शेख शफीक, राजेद्र गाडेकर, तुळशीराम घडे, विठ्ठल चव्हाण, एकबाल पठाण आदींचा समावेश होता.

संबंधित पोस्ट

कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी सहा जणांना जामीन मंजूर!न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; पुरोगाम्यांचा दबाव दूर करण्यासाठी पानसरे खटला कोल्हापूर जिल्ह्याबाहेर चालवा !

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील १० गावे स्मार्ट, इंटेलिजंट करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर देशातील पहिल्या स्मार्ट व इंटेलिजंट सातनवरी गावाचा शुभारंभ

देवणी येथे 2 एप्रिल रोजी महादेव यात्रेनिमित्तपशु व पक्षी प्रदर्शनाचे आयोजन

ठाणे जिल्ह्याच्या बळकटीकरणासाठी1700 कोटींच्या आराखड्यास वाढीव निधी देणार   -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जिल्हा वार्षिक योजना (2026-27) राज्यस्तरीय बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जूनलाआवेदनपत्र भरण्याची मुदत 16 एप्रिलपर्यंत…

मालवण बंदराचा सर्वांगीण विकास करणार – पालकमंत्री नितेश राणे