vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी सहा जणांना जामीन मंजूर!न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; पुरोगाम्यांचा दबाव दूर करण्यासाठी पानसरे खटला कोल्हापूर जिल्ह्याबाहेर चालवा !

 कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी सहा जणांना जामीन मंजूर!न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; पुरोगाम्यांचा दबाव दूर करण्यासाठी पानसरे खटला कोल्हापूर जिल्ह्याबाहेर चालवा !

   राज्य प्रतिनिधी-  मुंबई उच्च न्यायालयाने आज कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या ६ जणांना जामीन दिला. या निर्णयाचे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना मनापासून स्वागत करत आहेत. ‘हिंदु दहशतवादा’ची थियरी सिद्ध करण्यासाठी पद्धतशीरपणे ‘फेक नॅरेटिव्ह’ निर्माण केला गेला आणि पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणांमध्ये हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अडकवण्यात आले. पानसरे कुटुंबीय, तसेच अन्य तथाकथित पुरोगाम्यांनी या प्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना जामीन मिळू नये, यासाठी खूप आटापिटा केला होता. सातत्याने माध्यमांसमोर दिशाभूल करणारी भूमिका मांडून न्यायालय आणि पोलीस यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. हा खटला लांबवण्याचा प्रयत्न करत होते. या खटल्यात कोल्हापूरमध्ये पानसरे कुटुंबीय आणि पुरोगामी वापरत असलेले दबावतंत्र लक्षात घेता हा खटला यापुढेही कोल्हापूर येथे चालवला गेला, तर न्याय मिळण्यात अडचण निर्माण केली जाईल, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने न्यायालयाकडे विनंती करत आहोत की, पानसरे हत्या प्रकरणाचा खटला कोल्हापुरात न चालवता त्रयस्थ ठिकाणी चालवावा, अशी भूमिका सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी मांडली. पाकिस्तानातून आलेल्या आतंकवादी अजमल कसाबला आतंकवादाच्या घटनेत वकील दिला जातो; मात्र गरीब घरातील या हिंदू मुलांना वकील मिळू न देता तुरुंगात सडवण्याचा प्रयत्न हे पुरोगामी करत होते. एकीकडे न्याय मिळावा, असा टाहो फोडणारे पानसरे कुटुंबीय ‘हा खटलाच चालवू नये’, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जाऊन याचिका करून खटला लांबवत होते. पण आज या सर्व हिंदुत्वनिष्ठांना तब्बल सहा वर्षांनी जामीन मिळाला, याबद्दल आम्ही ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करतो, असे श्री. अभय वर्तक म्हणाले. श्री. अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था.

संबंधित पोस्ट

आई-वडिलांच्या सेवेसाठी कायद्याची गरज;आ. सुधीर मुनगंटीवार यांचे अशासकीय विधेयक सभागृहाच्या पटलावर विचारार्थ बदलत्या सामाजिक परिस्थितीत पालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विधेयक पालकांच्या पालन-पोषणाला कायदेशीर बळ देण्याचा आ.मुनगंटीवार यांचा पुढाकार

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा सुरळीतझाल्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना…

सामाजिक ऋण चुकविण्याचा रायगड डाक विभागाचा अनोखा पायंडा

बॅटरी वॅट क्षमतेमध्ये बदल केलेल्या ईव्ही बाईक्सवर कारवाई- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

बिहारच्या नव्याने शपथ घेतलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यामध्येकोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही- उद्योग मंत्री उदय सामंत