vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूशखबर ! सावंतवाडी रोड स्थानकावर ३ महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना नियमित थांबा मंजूर मध्य रेल्वे व कोकण रेल्वे प्रशासन कडून ‘गणेशोत्सव विशेष गाड्यां’ची घोषणा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना मोठे यश…

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूशखबर ! सावंतवाडी रोड स्थानकावर ३ महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना नियमित थांबा मंजूर मध्य रेल्वे व कोकण रेल्वे प्रशासन कडून ‘गणेशोत्सव विशेष गाड्यां’ची घोषणा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना मोठे यश…

ठाणे – प्रतिनिधी -आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुखकर, सोयीचा आणि सुरक्षित व्हावा, यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश गणपत म्हस्के यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. या विशेष प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या (TOD Special Trains) चालवण्याचा निर्णय घेण्यासोबतच सावंतवाडी रोड (SWV) स्थानकावर ३ प्रमुख लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर नियमित थांबा (Experimental Stoppage) मंजूर केला आहे. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

कोकणातील प्रवाशांची, पर्यटकांची आणि चाकरमान्यांची गर्दी व होणारी गैरसोय लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जी यांची भेट घेऊन विशेष गाड्यांची मागणी केली होती.

 १. सावंतवाडी रोड (SWV) स्थानकावर नियमित मंजूर झालेले नवीन थांबे -कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे जारी केलेल्या सूचनेनुसार सावंतवाडी स्थानकावर खालील गाड्यांना थांबा मंजूर झाला आहे. (KR/CO/O/NOTI/2026-27 date – 24 July 2026):

1. CSMT – मंगळुरू – CSMT एक्स्प्रेस (Daily):o गाडी क्र. १२१३३ (CSMT ते MAJN): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — सकाळी ०७:०२ / ०७:०४ (दिनांक २६ जुलै २०२६ पासून लागू).

o गाडी क्र. १२१३४ (MAJN ते CSMT): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — रात्री २३:३० / २३:३२ (दिनांक २७ जुलै २०२६ पासून लागू).

2. हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम ‘राजधानी’ एक्स्प्रेस (Tri-Weekly):

o गाडी क्र. १२४३२ (NZM ते TVC): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — सकाळी ०६:१८ / ०६:२० (दिनांक २६ जुलै २०२६ पासून लागू).

o गाडी क्र. १२४३१ (TVC ते NZM): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — सकाळी ०९:४४ / ०९:४६ (दिनांक २८ जुलै २०२६ पासून लागू).

3. लोकमान्य टिळक टर्मिनस – त्रिवेंद्रम ‘गरीब रथ’ एक्स्प्रेस (Bi-Weekly):

o गाडी क्र. १२२०१ (LTT ते TVCN): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — पहाटे ०२:०२ / ०२:०४ (दिनांक २७ जुलै २०२६ पासून लागू).

o गाडी क्र. १२२०२ (TVCN ते LTT): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — पहाटे ०३:२८ / ०३:३० (दिनांक ३० जुलै २०२६ पासून लागू).

 २. गणेशोत्सव २०२६ विशेष गाड्यांचे वेळापत्रक:मध्य रेल्वेने ११ सप्टेंबर २०२६ पासून खालील विशेष गाड्यांच्या फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे (Railway Letter No.T.322/X-12/Ganpati Specials/2026 date – 24 July 2026)

१. CSMT – सावंतवाडी – CSMT (दैनिक स्पेशल)· ट्रेन क्रमांक: 01103 / 01104· फेऱ्या व कालावधी: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ (एकूण १६ फेऱ्या)· वेळ: CSMT वरून निघणार: १५:३० | सावंतवाडी आगमन: ०४:०० (दुसऱ्या दिवशी)· प्रमुख थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ.

२. LTT – सावंतवाडी – LTT (दैनिक स्पेशल)· ट्रेन क्रमांक: 01171 / 01172· फेऱ्या व कालावधी: ११ ते २८ सप्टेंबर २०२६ (एकूण १७ फेऱ्या)· वेळ: LTT (लोकमान्य टिळक टर्मिनस) वरून निघणार: ०८:२० | सावंतवाडी आगमन: २१:००· प्रमुख थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली.

३. दिवा – खेड – दिवा (MEMU – दैनिक)· ट्रेन क्रमांक: 01155 / 01156· फेऱ्या व कालावधी: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ (एकूण १६ फेऱ्या)·वेळ: दिवा वरून निघणार: ०७:१५ | खेड आगमन: १४:३५· प्रमुख थांबे: निळजे, तळोजा, कलंबोली, पनवेल, पेन, माणगाव.

४. LTT – मडगाव / रत्नागिरी / सावंतवाडी· ट्रेन क्रमांक: 01165 / 01185· फेऱ्या व कालावधी: साप्ताहिक व द्विसाप्ताहिक फेऱ्या

· वेळ: विशेष वेळेनुसार· प्रमुख थांबे: ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, थिविम.५. पुणे – रत्नागिरी – पुणे (साप्ताहिक स्पेशल) ट्रेन क्रमांक: 01445 / 01447· फेऱ्या व कालावधी: १२ ते २६ सप्टेंबर २०२६ (विशेष फेऱ्या) वेळ: पुणे वरून निघणार: ००:२५ (मध्यरात्री) | रत्नागिरी आगमन: ११:५० प्रमुख थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल.

६. दिवा – चिपळूण – दिवा, ट्रेन क्रमांक: 01133 / 01134, फेऱ्या व कालावधी: ११ ते २८ सप्टेंबर २०२६ (एकूण १५ फेऱ्या)· वेळ: दिवा वरून निघणार: १३:४० | चिपळूण आगमन: २१:३०

 प्रमुख थांबे: पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड.चाकरमान्यांना व स्थानिकांना होणारे फायदे:सोयीस्कर प्रवास: ठाणे, दिवा, कल्याण, पुणे आणि मुंबई उपनगरांतील लाखो कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी गावी जाणे सुलभ होईल.तिकिटांच्या टंचाईपासून मुक्ती: अतिरिक्त गाड्यांमुळे ऐनवेळी होणारी धावपळ व तिकिटांची टंचाई दूर होईल.MEMU व नवीन थांब्यांचा दिलासा: MEMU गाड्यांमुळे स्थानिक प्रवाशांची सोय होईल, तर सावंतवाडी स्थानकावरील नवीन थांब्यांमुळे सिंधुदुर्ग, सावंतवाडी व परिसरातील पर्यटक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.”गणपती बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात जाणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि वेळेत व्हावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील होतो. कोकणवासीयांची प्रदीर्घ काळापासूनची मागणी मान्य केल्याबद्दल आणि तात्काळ निर्णय घेतल्याबद्दल आम्ही माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री मा. श्री अश्विनी वैष्णव जी यांचे मनःपूर्वक आभार मानतो.” — खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व खासदार नरेश गणपत म्हस्के

00000–

संबंधित पोस्ट

नौसेनेमधून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांसाठी 23 जुलै रोजी मेळाव्याचे आयोजन

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचीच वर्णी

vishwatmaklokswamivarta

98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन’ आणि ‘मराठी भाषा गौरव दिनानिमित्त”दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष मुलाखतींचे प्रसारण..

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाशिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

पीएम सेतू योजनाःऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण;रोजगारक्षम कौशल्यासाठी जिल्ह्यातील उद्योगांचा सहभाग

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अग्निशमन केंद्र उपयुक्त ठरेल- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अग्निशमन केंद्र, कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta