vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सर्वांना निरोगी आयुष्य दे… बळीराजासाठी चांगला पाऊस पडू दे – विठुराया चरणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घातलं साकडं विठुरायाच्या पंढरीत आयुर्वेदिक उपचार पद्धतीने केली गेली आरोग्यदायी सेवा

सर्वांना निरोगी आयुष्य दे… बळीराजासाठी चांगला पाऊस पडू दे – विठुराया चरणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घातलं साक-विठुरायाच्या पंढरीत आयुर्वेदिक उपचार पद्धतीने केली गेली आरोग्यदायी सेवा…

सोलापूर, प्रतिनिधी : सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ।। विठुरायाच्या चरणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव नतमस्तक होऊन सर्वांना चांगल आयुष्य ,आरोग्य लाभो आणि बळीराजासाठी चांगला पाऊस पडू दे… सर्वांना निरोगी आरोग्यदायी जिवन मिळु दे … असं साकडं विठूराया चरणी घातलं.8

आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी लाखो भाविक व वारकरी दिंड्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाऊन विठूराया चरणी नतमस्तक होतात. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या भक्तीमय सोहळ्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठ्ठल नगरीत विठ्ठला चरणी नतमस्तक होण्यासाठी एकवटतात. आषाढी एकादशी निमित्त केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी श्री पांडुरंगाचे मनोभावे दर्शन घेतले. देशातील प्रत्येक नागरिकाला चांगले निरोगी आयुष्य मिळू दे… अन्नधान्य पुरवणाऱ्या बळीराजासाठी दमदार पाऊस होऊ दे… असे साकडेही त्‍यांनी विठुराया चरणी घातले.

केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांची विठूराया चरणी सलग 43 वी वारी …

 

देशाचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे विठुरायाचे परमभक्त आहेत. कोरोनाचा दोन वर्षाचा कार्यकाळ सोडला तर गेल्या 43 वर्षापासून ते आषाढी एकादशीला नियमितपणे विठू चरणी नतमस्तक होण्यासाठी जात असतात.. प्रत्येक भारतीयांना निरोगी आयुष्य लाभू दे… बळीराजाला सुखी ठेव… चांगला पाऊस पडू दे.. असं साकडं त्यांनी आपली 43 वी वारी पूर्ण करताना विठ्ठल चरणी घातलं …

विठुरायाच्या पंढरीत आयुर्वेदिक उपचार पद्धतीने केली जातेय वारकऱ्यांची सेवा

 

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुखमार्ईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांना आयुष सेवा सुविधा केद्रामार्फत पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धतीने आरोग्यदायी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या आयुष सेवा सुविधा केंद्रावर वारकऱ्यांना आयुवैदीक, होमिओपॅथी औषध वाटप, योगाबाबत मार्गदर्शन, स्नेहन – स्वेदन (वाफ देणे ) वारकऱ्यांसाठी तेल – मसाज, विद्ध – कर्म, अग्नी – कर्म, चरण सेवा करण्यात येत आहे.

 

०००

संबंधित पोस्ट

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षकांचे प्रशिक्षण निवडणूक आयोगाकडून १,४४४ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय अर्थसंकल्प : युवाकेंद्रित, शेतकरीहितासह सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

vishwatmaklokswamivarta

मॅग्नेट प्रकल्प, कोल्हापूर अंतर्गत शेतकरी अभ्यासदौरा यशस्वीपणे संपन्न

उत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंडखैरी येथे गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचे उद्घाटन

जागतिक आदिवासी दिन विशेष..जंगलाच्या कुशीतून आकाशाकडे आदिवासी विद्यार्थ्यांची झेप…गडचिरोलीच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख-राष्ट्रपती भवन, संसद ते आयआयटी-विज्ञान केंद्र; शैक्षणिक अभ्यास दौऱ्यांतून दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसमोर खुली होताहेत नव्या संधींची क्षितिजे*

१ हजार ५२२ अग्निवीरांचा भव्य शपथविधी-परेड सोहळा उत्साहात संपन्न-राष्ट्रसेवेसाठी सज्ज झालेल्या अग्निवीरांनी घेतली निष्ठेची शपथ..