vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘पत्रकार संवादिका’ पुस्तिका, घडीपत्रिकेचे प्रकाशन

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘पत्रकार संवादिका’ पुस्तिका, घडीपत्रिकेचे प्रकाशन

 

 सांगली, प्रतिनिधी: जिल्हा माहिती कार्यालय, सांगली यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची घडीपत्रिका तसेच पत्रकारांसाठीच्या योजनांची माहिती देणाऱ्या ‘पत्रकार संवादिका’ या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या प्रकाशन कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पत्रकारांसाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्या तरी अनेकदा आवश्यक माहिती किंवा कागदपत्रांच्या अभावामुळे पात्र पत्रकारांना त्यांचा लाभ घेता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेली ही पुस्तिका पत्रकारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती देणारी घडीपत्रिका नागरिकांना त्या विभागाच्या विविध योजनांची माहिती समजण्यास उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन केले.

 पत्रकार संवादिकेत पत्रकारांसाठी शासन राबवत असलेल्या प्रमुख योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली असून, प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहितीही स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या प्रमुख योजनांची माहिती घडीपत्रिकेत देण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांचे प्रबोधन होण्यास मदत होईल.

 कोल्हापूर विभागाचे उपसंचालक प्रवीण टाके यांच्या संकल्पनेतून आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून ही पुस्तिका तयार करण्यात आली असून, त्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) व अनुसूचित जाती उपयोजना यांच्या निधीतून पुस्तिका व घडीपत्रिका तयार करण्यात आली आहे. कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी घडीपत्रिका तसेच, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी पत्रकार संवादिका पुस्तिकेच्या निर्मितीमागील उद्देश स्पष्ट केला. जिल्हा माहिती कार्यालयाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत, पत्रकार कल्याणासाठी ही पुस्तिका प्रभावी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

00000

संबंधित पोस्ट

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्यासाठी कटिबद्ध- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न – स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत तीन टप्प्यांसाठी जिल्ह्याचा विकास आराखडा निश्चित- जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाच्या नियोजनाची अंमलबजावणी सुरू

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या माध्यमातून मयताच्या वारसास महाराष्ट्र ग्रामीण बँकेने दिला दोन लाखाचा धनादेश..

vishwatmaklokswamivarta

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सकारात्मक निर्णयामुळे अ‍ॅड.भास्कर मगरे यांच्या आंदोलनाला यश-अभिमन्यू खोतकर दलित आदिवासी भूमिहीन कासकारांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार- दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे

ठाणे जिल्हा रुग्णालय एमएमआर मधील नागरिकांसाठी वरदान ठरणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घ्यावी..

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील मढ गावासाठी टँकर मंजूर