vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

भारतीय टपाल विभागाची “फ्रँचायझी 2.0” योजना सुरू;रोजगारासह टपाल सेवा विस्ताराची मोठी संधी

भारतीय टपाल विभागाची “फ्रँचायझी 2.0” योजना सुरू;रोजगारासह टपाल सेवा विस्ताराची मोठी संधी

लातूर, प्रतिनिधी: भारतीय टपाल विभागामार्फत नागरिकांना अधिक वेगवान, सुलभ आणि त्यांच्या निवासस्थानाच्या जवळ टपाल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी “फ्रँचायझी 2.0” ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून स्थानिक उद्योजक, दुकानदार आणि इच्छुक व्यक्तींना विभागाचे अधिकृत फ्रँचायझी भागीदार म्हणून काम करण्याची संधी मिळणार असून, टपाल सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

फ्रँचायझी धारकांना स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल, पार्सल बुकिंग आणि टपाल वितरण यांसारख्या सेवा पुरविता येतील. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलद व कार्यक्षम सेवा देण्यासोबतच, या योजनेमुळे स्थानिक युवकांसाठी स्वयंरोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये टपाल सेवेचा विस्तार करणे आणि विभागाच्या देखरेखीखाली एक विश्वसनीय यंत्रणा उभी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

ज्या इच्छुक नागरिकांकडे आवश्यक जागा, मूलभूत सोयी-सुविधा आणि निर्धारित पात्रता आहे, ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात. “फ्रँचायझी 2.0” योजना ही टपाल सेवांचा विस्तार, डिजिटल सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती यांचा एक प्रभावी संगम आहे. या योजनेमुळे टपाल सेवा अधिक लोकाभिमुख आणि परिणामकारक होणार असून, जास्तीत जास्त इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर विभागाचे डाकघर अधीक्षक आर. एस. बोटलावार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी आपल्या जवळच्या मुख्य टपाल कार्यालयाशी किंवा विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.

****

संबंधित पोस्ट

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

लातूर जिल्ह्यात १७ कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टी अनुदान वितरणात सुलभता येण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी,आवश्यक; शनिवार(दि.८), रविवार(दि.९) प्रत्येक गावात विशेष कॅम्प

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासनामार्फत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहीम

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी (EKYC) करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून, महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.