vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

लातूर, प्रतिनिधी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८१(१) (ब) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम ६९ (१) (फ) मधील तरतुदीनुसार, सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षणासाठी सन २०२६-२०२८ या कालावधीची राज्यस्तरीय लेखापरिक्षकांची नवीन नामतालिका तयार करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांकडून ६ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत

पात्र लेखापरिक्षकांनी https://mahasahakar.maharashtra.gov.in/en/ या संकेतस्थळावर जाऊन विहित मुदतीत आपले अर्ज सादर करावेत. ऑनलाईन अर्जासंदर्भातील सविस्तर परिपत्रकीय सूचना सहकार विभाग, सहकार आयुक्त व निबंधक यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, या सूचनांची प्रत सर्व जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरिक्षक आणि विभागीय सहनिबंधक यांच्या कार्यालयामध्येही इच्छुकांच्या माहितीसाठी उपलब्ध आहे. तरी संबंधित व्यावसायिक आणि संस्थांनी या संधीचा लाभ घेऊन वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन लातूरचे जिल्हा उपनिबंधक व्ही. एल. पोतंगले यांनी केले आहे.

****

संबंधित पोस्ट

दहावीच्या शालांत परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका 23 माध्यमिक शाळांचा निकाल 94.72 टक्के**अंशिका यादव 95 टक्के गुण संपादन करीत नमुंमपा शाळांमध्ये सर्वप्रथम*

पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे यांनी वैश्य समाज स्नेहमेळाव्यात-दिली पर्यटन योजनांची सविस्तर माहिती

vishwatmaklokswamivarta

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्य सरकारचा मोठा निर्णय- बीड जिल्ह्यातील मस्या जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती…

vishwatmaklokswamivarta

राज्य राखीव दल अधिक सक्षम करण्यावर भर- पालकमंत्री संजय शिरसाट

कबड्डी असोसिएशनच्यावतीने निवड चाचणी स्पर्धा…

vishwatmaklokswamivarta