vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार       -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार       -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

         अमरावती, प्रतिनिधी : जिल्हा स्त्री रूग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. यात तीन नवजात बालके मृत्यूमुखी पडली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भविष्यात राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना टाळण्‍यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

   राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यांनी आज जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आग लागलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. आमदार प्रतापदादा अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी आदी उपस्थित होते.

  श्रीमती बोर्डीकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींची सखोल चौकशी करून अहवाल देणार आहे. चौकशी कोणत्याही व्यक्तीने दुर्लक्ष केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी राज्यातील सर्व रूग्णालात उपाययोजना करण्यात येतील. रूग्णालायातील बालके इतर रूग्णालयात हलविण्यात आली आहेत. त्यांच्यावर दर्जेदार उपचार करण्यात येतील. तसेच आगीच्या घटनेवेळी कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान राखत बचाव केला. याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आगीच्यावेळी गांभीर्याने घटनेचा सामना केल्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.    यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयात तातडीने उभारण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षाला भेट देऊन पाहणी केली.

00000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी व उदैती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक, उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला दिल्या तातडीने सूचना

गांधी चमन येथे ब्राह्मण समाजाचे दीपक रणवरे यांचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले असून भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले यावेळी निवासी जिल्हाधिकारी श्री रामदास दौंड पोलीस अधीक्षक अनंत कुलकर्णी तहसीलदार धैर्यशील गवळी यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्या शासन दरबारी मान्य चे लेखी आश्वासन दिले,जालन्यात ब्राह्मण समाजाचे दीपक रणनवरे यांचे आमरण उपोषण मागे *भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या मध्यस्थीला यश; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई प्रतिभावंतांचे शहर म्हणून उदयास येईल – नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी महापौर श्रीम. सुजाता पाटील यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

मेळघाटातील अंगणवाडी, पोषण पुनर्वसन केंद्रांना मंत्री तटकरे यांच्या भेटी

टाईमलाईन’ समाजात सकारात्मकता पेरणारे पुस्तक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांच्या ‘टाईमलाईन’ पुस्तकाचे प्रकाशन