vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने काठमांडू–जनकपूर प्रवासासाठी चार मिनी बसची व्यवस्था नेपाळमध्ये अडकलेल्या १०६ प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने काठमांडू–जनकपूर प्रवासासाठी चार मिनी बसची व्यवस्था-नेपाळमध्ये अडकलेल्या १०६ प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू

मुंबई, प्रतिनिधी : नेपाळमधील काठमांडू येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील १०६ प्रवाशांचा सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे काठमांडूहून जनकपूरपर्यंत प्रवासासाठी चार मिनी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रवाशांना २८ ऑगस्ट रोजी बिहारमधील दानापूर येथून संघमित्रा एक्सप्रेसने महाराष्ट्रात परतायचे नियोजित होते. मात्र, नेपाळमधील सद्यस्थितीमुळे काठमांडूहून मोठ्या बसने पुढील प्रवास करणे शक्य नसल्याने दानापूरपर्यंत वेळेत पोहोचण्याची अडचण निर्माण झाली होती.

प्रवाशांची ही अडचण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास येताच त्यांनी प्रवासी योगेश गावंडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, नेपाळमधील स्थानिक प्रशासन आणि नेपाळचे खासदार संदीप राणा यांच्याशी समन्वय साधला. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानंतर खासदार संदीप राणा यांनी काठमांडूहून जनकपूरपर्यंत चार मिनी बसची व्यवस्था केली. त्यानुसार सर्व १०६ प्रवासी काठमांडूहून जनकपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. प्रवासी उद्या सकाळी जनकपूरमार्गे भारत – नेपाळ सीमेवर पोहोचणार असून, तेथून त्यांना बिहारमधील दानापूरपर्यंत नेण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. दानापूर येथून रेल्वेने महाराष्ट्रात परतण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सर्व प्रवासी सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत येईपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या संपर्कात राहून आवश्यक समन्वय साधत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या तातडीच्या मदतीबद्दल योगेश गावंडे आणि सहप्रवाशांनी कृतज्ञता व्यक्त केली असून मुख्यमंत्र्यांनी स्वतः संपर्क साधून अडचण जाणून घेतली आणि तातडीने प्रवासाची व्यवस्था केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

०००००

संबंधित पोस्ट

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १५० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचामंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून आढावा

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन ‘एसओपी’ निश्चित करणार – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल**जपतलई सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन; घटनास्थळाची पाहणी*मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत; मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त ५ लाखांसाठी प्रस्ताव”

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश.

राज्यातील सर्व महामार्ग आणि राज्य मार्ग यासह रस्त्यांवर देशी झाडांची लागवड करण्याच्या सूचना- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले झाडे जगवण्यासाठीही यंत्रणा उभारून नियमित तपासणी करणार…

सुरंगीच्या सुगंधाने निसर्गोद्यान दरवळणार – महापौर, आयुक्त व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

कर्णपुरा यात्रोत्सव पूर्वतयारी आढावाशासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta