vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

श्रीक्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा पुरातत्व विभागाच्या सूचनांनुसार विकास कामे करा-बी. वेणूगोपाल रेड्डी

श्रीक्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा पुरातत्व विभागाच्या सूचनांनुसार विकास कामे करा-बी. वेणूगोपाल रेड्डी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- श्रीक्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखड्यानुसार विकास कामे करतांना पुरातत्व विभागाने केलेल्या सूचनांनुसार करावी. तसेच स्थानिक राहिवासी, दुकानदार आणि यात्रेकरू अशा सर्व घटकांना सर्वसमावेशक ठरेल अशी अंमलबजावणी करावी, असे निर्देश अपर मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी आज येथे दिले

श्रीक्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा अंमलबजावणी संदर्भात आज आढावा घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन समिती सभागृहात घेण्यात आला

मुख्य निवडणूक अधिकारी पी. चोकलिंगम, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., पुरातत्व विभागाचे सह संचालक अनिल तिवारी, उपसंचालक सुब्रह्मण्यम, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री,जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, अधीक्षक अभियंता एस. एस. भगत, कार्यकारी अभियंता स्मिता पवार, जिल्हा सह आयुक्त न. प. प्रशासन सौरभ जोशी तसेच वन विभाग आदी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत माहिती देण्यात आली की, आराखड्याप्रमाणे सुरु असलेल्या कामातील भक्तनिवास, शॉपिंग सेंटर, भक्त मार्गिका, दर्शन बारी, पार्किंग, दर्शन बारी साठी अंडर पास इ. कामे गतीने सुरु आहेत. त्यातील काही कामे ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होतील. अंडर पास साठीचे सीमांकन पुरातत्त्व विभागाकडून करून देण्यात आले आहे.

श्री. रेड्डी यांनी निर्देश दिले की, निर्माण होत असलेल्या सुविधा ह्या सर्वसमावेशक असाव्या. मंदिर परिसरातील दुकानदार, स्थानिक राहिवासी यांना सुविधा जनक वाटावे असे नियोजन असावे. येणारे यात्रेकरू जे भक्त असतील किंवा पर्यटक या सगळ्यांना सुकर वाटावी, अशी सुविधा निर्मिती व्हावी. परिसरातील महादेव वन, लेणी आणि मंदिर परिसराला जोडणाऱ्या ह्या सुविधा असाव्यात. जेणेकरून येणारे पर्यटक सर्व भागांना भेटी देऊ शकतील.

जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले की, या विकास आराखड्याची अंमल बजावणी करतांना पुरातत्व विभागाने केलेल्या सूचनांचा पूर्ण अंतर्भाव करण्यात येईल. तसेच सर्व घटकांना सामावून घेण्यात येईल. तसेच बफर झोन मध्ये संबंधित विभागाच्या अभिप्रायानंतर निर्णय घेण्यात येईल. तसेच घन कचरा व्यवस्थापन संदर्भात उपाययोजना अंमलबजावणीबाबत प्रयत्न सुरु आहेत, असेही त्यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार राज्य शासनाचे सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट – उपमुख्यमंत्री

शेती स्वालंबन मिशनच्या अध्यक्षांची पोहरापुर्णा येथे सांत्वनपर भेट

vishwatmaklokswamivarta

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचा मार्ग मोकळा न्यायालयाचा शासनाच्या बाजूने निकाल,- न्यायालयाने शेतकऱ्यांचा मनाई हुकुमाचा अर्ज फेटाळला- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीलाच अण्णाभाऊ प्रेमींना मिळाली भेट- वाटेगाव येथे साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक..

अयोध्या नगर येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते महाआरती

रोटरी इंटरनॅशनलचे दक्षिण कोरियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुप्रसिद्ध नेते संगकू युन यांचा मुंबई दौरा संपन्न, भारत देशात समाजसेवेसाठी अनेक संधी…

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी विभाग-एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

vishwatmaklokswamivarta