vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेची पाणीपट्टी वसुलीत ऐतिहासिक कामगिरी !आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये तब्बल 112 कोटींची पाणीपट्टीची वसुली

नवी मुंबई महानगरपालिकेची पाणीपट्टी वसुलीत ऐतिहासिक कामगिरी !आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये तब्बल 112 कोटींची पाणीपट्टीची वसुली

    नवी मुंबई प्रतिनिधी  – नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये म्हणजेच 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत तब्बल 112 कोटींची पाणीपट्टीची वसूली करून विक्रमी कामगिरी नोंदविली आहे. महानगरपालिका स्थापन झाल्यापासून एका आर्थिक वर्षात झालेली ही सर्वाधिक पाणीपट्टी वसुली असून ही एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.

          शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच प्रभावी नियोजनबद्ध वसुली मोहिमेमुळे ही यशस्वी कामगिरी साध्य झाली आहे. पाणीपट्टी वेळेत भरणाऱ्या नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

          यामागे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे प्रभावी नेतृत्व, दूरदृष्टी आणि काटेकोर नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. पाणीपट्टी वसुली प्रक्रियेत पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि नागरिकांपर्यंत सहज पोहोचणारी कार्यपद्धती यावर विशेष भर देण्यात आला. विविध उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून त्याचा सकारात्मक परिणाम वसुलीत दिसून आला.

          अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागाने व संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पाणीपट्टी वसुलीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. ऑनलाईन पेमेंट प्रणाली, क्यू आर कोड द्वारे, विविध डिजिटल माध्यमांद्वारे सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच एसएमएस, नोटीस, व्हॉट्सअॅप संदेश आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने वसुली प्रक्रियेला गती मिळाली. तसेच नोकरदार वर्गास आणि सर्वसामान्य नागरिकांना मार्च 2026 मध्ये साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील पाणी पट्टी भरणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेची पाणी देयक संकलन केंद्रे सुरू ठेवण्यात आली होती.   या सर्व सुविधांमुळे यंदा पाणीपट्टी वसुलीत लक्षणीय वाढ झाली असून आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 112 कोटींची विक्रमी वसुली करण्यात आली आहे.   या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महापौर श्रीमती सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पाणी पुरवठा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

जालन्यात प्रथमच बुद्धिबळ स्पर्धेचे रंगतदार आयोजन!जालना गणेश फेस्टिव्हल तर्फे खुली, 15 व 10 वर्षाखालील गटांत स्पर्धा – विजेत्यांना रोख पारितोषिके व ट्रॉफी

निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार – नवी मुंबई अंतर्गत शाळाप्रमुखांना अंतिम इशारा

मान्सूनपूर्व तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सविस्तर आढावा सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ.

बदलापूर येथे दि.18 फेब्रुवारी रोजी’नक्शा’ प्रकल्पाचा होणार शुभारंभ..

vishwatmaklokswamivarta

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 102 प्रकरणे पात्र

शहरी नक्षलवादी संघटनांच्या कारवायांना चाप लावण्यासाठी आवश्यक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर.