vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विधानपरिषद कामकाज/नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा-अमरावती ‘एमआयडीसी’साठी सकारात्मक निर्णय घेणार – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

विधानपरिषद कामकाज/नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा-अमरावती ‘एमआयडीसी’साठी सकारात्मक निर्णय घेणार – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

मुंबई, प्रतिनिधी : अमरावती जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी शासन सकारात्मक असून, एमआयडीसी संदर्भातील प्रलंबित प्रश्नांवर लोकप्रतिनिधी व उद्योजकांसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषदेत नियम ९७ अन्वये सदस्य संजय खोडके यांनी अमरावती येथील एमआयडीसी व औद्योगिक विकासासंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली. या चर्चेत सदस्य डॉ. परिणय फुके यांनी सहभाग घेतला.

उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले की, अमरावती जिल्हा गुंतवणूक परिषदेत २ हजार ८८५ कोटी रुपयांचे नवीन गुंतवणूक करार झाले असून, सुमारे ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक विभागात येण्याची शक्यता आहे. पीएम टेक्सटाईल पार्कसाठी भूखंड दरात कपात करण्यात आली असून, अर्जाची मुदत एक वर्षाने वाढविण्यात येणार आहे.

अमरावतीतील उद्योगांना चालना देण्यासाठी रेमंड व भारत डायनॅमिक्स यांसारख्या उद्योग समूहांशी चर्चा करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच एमआयडीसीतील रिक्त भूखंडांचा आढावा घेऊन ते नवीन उद्योजकांना उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

एमआयडीसीतील प्रलंबित प्रश्न, रिक्त भूखंड, तसेच औद्योगिक अनुशेष दूर करण्यासाठी अधिवेशनानंतर महिनाभराच्या आत अमरावती येथे लोकप्रतिनिधी व उद्योजकांची बैठक घेण्यात येईल, असेही उद्योगमंत्री सामंत यांनी नमूद केले.

0000000

संबंधित पोस्ट

झुरळाच्या ( CJP ) राष्ट्र विरोधी आंदोलना विरोधात रत्नागिरीत सर्व सामान्य नागरीक रस्त्यावर उतरले!कोकणातून सुरु

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी -मंत्री मंगलप्रभात लोढा§ जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार§ जनता दरबाराला उदंड प्रतिसाद, म्हाडा संक्रमण शिबिराचा प्रश्नही लवकरच सोडवणार.

नमुंमपा निवडणूकीत प्रथमत:च बहुसदस्यीय पध्दतीने मतदान होत असल्याने विविध स्वरूपात जनजागृती…

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे ⁠थ्री स्टार करणार,राज्यातील १२५ वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद   – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट- मिरजमधील दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतींचे लोकार्पण

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत बांधकाम कामगारांना “गृहउपयोगी वस्तू संच” निशुल्क्‍ वाटप

नांदेड विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी 8 उमेदवारांचे 17 नामनिर्देशन अर्ज दाखल