vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यात वादळी वारा आणि पाऊस वीज पडल्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू वृत्त

उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यात वादळी वारा आणि पाऊस वीज पडल्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू वृत्त

राज्य प्रतिनिधी-उत्तर प्रदेशात वादळी पाऊस आणि वीज पडल्याच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. भदोही जिल्ह्यात सर्वाधिक १५ मृत्यूंची नोंद झाली आहे.

याशिवाय, मिर्झापूरमध्ये १०, फतेहपूरमध्ये ९, बदाऊनमध्ये ५, तर बरेलीत ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बहुतांश मृत्यू हे वीज पडल्यानं, भिंत कोसळल्यानं आणि वेगाच्या वाऱ्यामुळे झाडे अंगावर पडल्यानं झाले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची तातडीनं दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तसेच, बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत पुरवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

संबंधित पोस्ट

सीएनजी दुर्घटना नियंत्रणासाठी विविध यंत्रणांची संयुक्त रंगीत तालीम• लातूरमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रभावी सादरीकरण..

प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे-शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी चित्ररथ तयार करा- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta

बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात…बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१३% मतदानाची नोंद झाली आहे.

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईत आणीबाणीच्या कालखंडाविषयी विविध उपक्रमांतून लोकशाहीचा जागर*

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी

आपण करत असलेले काम ही देशसेवा – राज्यपाल आचार्य देवव्रत ‘एचएएल’च्या तंत्रज्ञांचे राज्यपालांकडून कौतुक