vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी

इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी…

मुंबई, प्रतिनिधी: राज्यात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी) 26 एप्रिल 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in आणि https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.

शासनमान्य शाळांमधून 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व सातवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र आणि शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी 2 फेब्रुवारी 2026 पर्यंतचा कालावधी देण्यात आला असून विलंब, अतिविलंब आणि अति विशेष विलंब शुल्कासह 28 फेब्रुवारी 2026 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, असे परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

 

०००

संबंधित पोस्ट

📢 लातूर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जालना येथे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खरीप 2025 विमा साठी बेमुदत मुक्काम ठोको आंदोलन 

तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी बालकांना सुट्टी देण्याची आयोगाची शिफारस पोषण आहाराची पर्यायी व्यवस्था करा; बालहक्क संरक्षण आयोगाचे महिला व बालकल्याण विभागाला निर्देश,बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांची माहिती..

धीरज परदेशी हत्या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी 

प्रांतधिकारी, जात पडताळणी अधिकाऱ्यांसोबत अडीच तासांची सविस्तर बैठक**आजपासून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात शिबिर ; शून्य प्रलंबित्व करण्याचे आदेश**मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड यांचा आठही जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद*

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनामहाडीबीटी पोर्टलचे काम पूर्ण होताच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला होणार सुरुवात ..

vishwatmaklokswamivarta