vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनामहाडीबीटी पोर्टलचे काम पूर्ण होताच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला होणार सुरुवात ..

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनामहाडीबीटी पोर्टलचे काम पूर्ण होताच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला होणार सुरुवात ..

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळ देणारी व पशुपालन व्यवसायाला उद्योजकतेचे आधुनिकस्वरूप देणारी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनाअत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी पशुसंवर्धन विभाग कटिबद्ध आहे. महाआयटीकडून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्राप्त करुन घेण्यासाठी सुविधा निर्माण करणे सुरु असून, हे काम पूर्ण होताच इच्छुक लाभार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतील, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ.किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी दिली आहे.

राज्यातील पशुसंवर्धन व्यवसायाला नवीन दिशा देण्यासाठी व ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीनिर्माण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना देणारीही योजना राज्याच्या आर्थिक विकासात भरीव योगदान देणारी ठरणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातील युवा वर्गासह शेतकरी व पशुपालकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर योजनेची अंमलबजावणी वेळेवर व पारदर्शकपणे व्हावी, यासाठी पशुसंवर्धन विभागानेसूक्ष्म नियोजन सुरू केले आहे.

 महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज प्रक्रिया-लाभार्थ्यांना घरातूनच सहज अर्ज करता यावा, यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी महाआयटीकडे विशेष पोर्टल निर्मितीचेकाम सोपविण्यात आले आहे. महाआयटीची तांत्रिक टीम हे पोर्टल लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. पोर्टलचे काम पूर्ण होताच, योजना अधिकृतपणे सुरू झाल्याची सूचना पशुसंवर्धन विभागामार्फत लवकरच जारी करण्यात येईल, असे आयुक्त डॉ.किरण पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

माहितीसाठी 1962 वर संपर्क साधा- ;मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेविषयी कोणतीही अधिकृत माहिती, शंका किंवा मार्गदर्शनासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी 1962 या टोल-फ्री कॉल सेंटर क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच आपल्या परिसरातील नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधून माहिती घ्यावी.

0000000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार-राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

vishwatmaklokswamivarta

महापौर, पोलीस आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांची काळाराम मंदिराला भेट व पाहणी

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात 17 ऑगस्टपर्यंत ‘तिरंगा आणि वंदे मातरम्’ विषयक माहितीपूर्ण प्रदर्शन

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घडवले लोकधारेचे दर्शन !शिर्डीत जलसंपदा विभागाचा सांस्कृतिक सोहळा उत्साहात 

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांतील भूमिहीनांना मोफत शेतजमीनकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत लाभ; प्रस्ताव ५ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अत्याधुनिक दोन ‘मॅग्लुमी’ मशीनचे लोकार्पण विविध रक्त चाचण्या होणार अधिक वेगाने; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा..