vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकाचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश**”रोबोटिक बोयो” ची उपयुक्तता पुन्हा झाली अधोरेखित*

*काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकाचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश**”रोबोटिक बोयो” ची उपयुक्तता पुन्हा झाली अधोरेखित*

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काशीद बीचवर आलेल्या एका पुणेकर कुटुंबावर आज सकाळी काळाने झडप घातली होती. मात्र, पोलिसांच्या प्रसंगावधान आणि तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असून, एका २० वर्षीय तरुणीला समुद्रात बुडताना अगदी ऐनवेळी सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण च्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या “रोबोटिक बोयो” ची उपयुक्तता या प्रसंगामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. या रिमोट ऑपरेटेड वॉटरक्राफ्टमुळे वीस वर्षीय तरुणीचा जीव वाचविण्यास प्रशासनाला यश मिळाले आहे.
 आज सकाळी ७.४० वाजताच्या सुमारास, पुणे येथील रहिवासी असलेले आकाश साबळे आणि सिद्धी साबळे हे आपल्या कुटुंबासह काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते. हे कुटुंब पोहण्यासाठी पाण्यात उतरले. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने सिद्धी साबळे (वय २० वर्षे) ही तरुणी अचानक समुद्राच्या खोल पाण्यात ओढली जाऊ लागली आणि बुडत असल्याचे लक्षात आले.
    या कठीण प्रसंगी कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई (बकल नंबर १०२८) प्रविण रोटकर आणि पोलीस शिपाई (बकल नंबर १५३१) जितेंद्र माने यांनी जराही वेळ न गमावता तात्काळ धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या पोलीस कर्मचाऱ्यांनी वॉटरक्राफ्टच्या (रोबोटिक बोयो) मदतीने वेगाने समुद्रात धाव घेतली बुडणाऱ्या सिद्धी साबळे हिला सुखरूप बाहेर काढले.
     या देवदूत ठरलेल्या रोबोटिक बोयो, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वांनी आभार मानले आहेत.
000000000

संबंधित पोस्ट

मालमत्ता धारकांनी ‘केवायसी’ करण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांना आवाहन

जम्मू कश्मीरच्या पहलगाव येथे झालेल्या पाकिस्तान समर्पित आतंकवादी यांचा हल्ल्याच्या निषेधार्थ 27 लोक मृत्युमुखी पडले अनेक जखमी झाले त्यावर अभिनेता सलमान खान शाहरुख खान प्रियंका चोप्रा यांनी दिल्या प्रतिक्रिया…..

महिलांसाठी 23 मार्चला विशेष रोजगार मेळावा  

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू- उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबईच्या कुर्ला नेहस्नगरात एक नगर एक होळी…

vishwatmaklokswamivarta

कोकणवासियांना मोठा दिलासा- गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे तिकीटासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात दोन अतिरिक्त तिकीट खिडक्या    खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन सावंतवाडी स्थानकावर 3 महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर,प्रवासी संघटनेने मानले नरेश म्हस्के यांचे आभार