vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात 17 ऑगस्टपर्यंत ‘तिरंगा आणि वंदे मातरम्’ विषयक माहितीपूर्ण प्रदर्शन

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात 17 ऑगस्टपर्यंत ‘तिरंगा आणि वंदे मातरम्’ विषयक माहितीपूर्ण प्रदर्शन

 

      नवी मुंबई प्रतिनिधी-    9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ मोहीम नवी मुंबईत उत्साहाने राबविण्यात येत असून त्या अंतर्गत सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, साहित्य, सामाजिक, आरोग्य व स्वच्छताविषयक विविध उपक्रम उत्साहाने राबविण्यात येत आहेत.

          या अनुषंगाने 14 ऑगस्ट रोजीच्या ‘फाळणी भयावहता स्मृती दिना’निमित्त विष्णुदास भावे नाट्यगृह येथे दोन दिवसीय फाळणीविषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच महापालिका मुख्यालयात याविषयी माहितीपूर्ण लघुपटाचे प्रक्षेपण करण्यात आले होते.

          यावर्षी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण होत असल्याने ‘हर घर तिरंगा’ मोहीम ही ‘वंदे मातरम्’ च्या 150 वर्षांच्या स्मरणाशी जोडली गेली असल्याने भारत सरकारच्या संस्कृति मंत्रालयाच्या वतीने निर्मिलेल्या ‘तिरंगा आणि वंदे मातरम् प्रदर्शना’चे आयोजन नमुंमपा मुख्यालय, सीबीडी बेलापूर येथे 15 ते 17 ऑगस्ट 2026 कालावधीत करण्यात आले आहे.

          स्वातंत्र्यदिनी मुख्यालयातील ध्वजारोहणानंतर महापौर श्रीम. सुजाता पाटील, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीम. सलुजा सुतार, नगरसेविका श्रीम.नेत्रा शिर्के, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, प्रशासन उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे. शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड आणि इतर मान्यवर, अधिकारी, कर्मचारीवृंद तसेच मोठ्या संख्यने उपस्थित असलेल्या नागरिकांनी ‘ध्वज, राष्ट्रगान, देश’ या प्रदर्शनाला भेट देत तिरंगा ध्वजाची आणि राष्ट्रीय गीताची सविस्तर माहिती आणि इतिहास जाणून घेतला.

          नुकतीच 7 नोव्हेंबर, 2025 रोजी भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरम् च्या रचनेला 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. मातृभूमीला वंदन करणारे हे गीत स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्र निर्माणाला वाहून घेतेलेल्या अगणित पिढ्यांना प्रेरणा देणारे एक चिरंतन स्तोत्र आहे. हे गीत भारताच्या राष्ट्रीय अस्मिता आणि सामूहिक आत्म्याचे एक चिरस्थायी प्रतिक आहे.

          बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेले ‘वंदे मातरम्’ हे गीत, 7 नोव्हेंबर 1875 रोजी ‘बंगदर्शन’ या साहित्यविषयक नियतकालिकेत पहिल्यांदा प्रकाशित झाले होते. त्यानंतर बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे प्रार्थना गीत, 1882 मध्ये प्रकाशित झालेल्या, ‘आनंदमठ’ या आपल्या अजरामर कादंबरीत समाविष्ट केले होते.

          त्यानंतर गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनी या गीताला संगीतबद्ध केले. आणि आज हे गीत देशाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक चेतनेचा अविभाज्य भाग बनले आहे. या गीताला 150 वर्षे पूर्ण होत असल्याचा महत्त्वाचा टप्पा साजरा करताना विविध उपक्रमांच्या माध्यमातून वंदे मातरम् गीताने एकता, त्याग आणि समपर्णाचा दिलेला कालातीत संदेश पुन्हा एकदा दृढ केला जात आहे.

          या अनुषंगाने सीबीडी बेलापूर येथील नमुंमपा मुख्यालयात तळमजल्यावर हे ‘तिरंगा व वंदे मातरम् प्रदर्शन’ 17 ऑगस्टपर्यंत प्रदर्शित केले जात असून नागरिकांनी या माहितीपूर्ण प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन ‘वंदे मातरम् या प्रेरणादायी गीताचा इतिहास जाणून घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. त्यातही शाळांनी विद्यार्थ्यांना प्रदर्शन दाखविण्यासाठी याठिकाणची भेट घडवावी असेही शाळा व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन**जिल्ह्याची परंपरा अधिक उज्वल करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनाच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी विशेष रक्तदान शिबीरसहकार विद्यामंदिर येथे आयोजन ; बुलढाणावासियांनी रक्तदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जालना शहरातील भटक्या जनावरांच्या मालकांवर कठोर कारवाई करणार जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहराला जोडणारा सांगवी बोपोडी पूल तीन महिन्यासाठी वाहतुकीस बंद

vishwatmaklokswamivarta

सैन्यदल, नौदल, वायुदल भरतीपूर्व निःशूल्क प्रशिक्षण