vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

लातूरला जलसुरक्षित, सक्षम जिल्हा बनविणार -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

लातूरला जलसुरक्षित, क्षम जिल्हा बनविणार -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण…

लातूर प्रतिनिधी-लातूर, दि. १५ (जिमाका): जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच जिल्ह्याला जलसुरक्षित आणि अधिक सक्षम बनविण्याचा संकल्प पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन केले.

या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषा पाटील, लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतेस्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नातील सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत घडविणे ही आपली जबाबदारी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असल्याचे पालकमंत्री भोसले यांनी सांगितले.५४ हजार ३८८ शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची पहिली यपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील ५४ हजार ३८८ शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यापैकी २२ हजार ९६३ शेतकऱ्यांसाठी १५९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही लवकरच निधी वर्ग करण्यात येणार आहे. कृषी यांत्रिकीकरण आणि सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन दिले जात आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून गतवर्षी जिल्ह्यातील ४ हजार २०० शेतकऱ्यांना १० कोटी १५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.जलसंधारण सप्ताहात सहभागाचे आवाहन

पाण्याचे संवर्धन आणि काटकसरीने वापर ही काळाची गरज आहे. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन पाळला जात आहे. त्यानिमित्त १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन—वॉक फॉर वॉटर’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पाण्यासाठी समाजाने एकत्र येण्याचा हा संकल्प आहे. युवा, विद्यार्थी, महिला बचत गट, शेतकरी आणि सामाजिक संस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी ‘महा वॉकेथॉन—वॉक फॉर वॉटर’ लोगोचे अनावरण करण्यात आले. उपस्थितांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात आली

रस्ते आणि पायाभूत सुविधांना गती

लातूर जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, उद्योग, रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यात येत आहे. आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने जिल्ह्यातील १२९ किलोमीटर लांबीच्या पाच प्रमुख रस्त्यांसाठी १ हजार ३०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सहकार विभागाची कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी लातूर येथे सहकार भवनाची उभारणी करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

अनंत चतुर्दशी दिनी होणा-या श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सुव्यवस्थित नियोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समितीची पुर्नगठीत करण्यासाठीइच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

भगवान बाबा बालिकाश्रमास उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेआणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट       

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम; ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ७८ प्रकरणे निकाली; २०.५५ कोटींची तडजोड

ध्वजदिन निधीसाठी रुपये 5 लाख मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे सूपूर्द