vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा ‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षांच्या स्मरणासह ‘विकसित भारत@2047 साठी युवा शक्ती’चा संदेश

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षांच्या स्मरणासह ‘विकसित भारत@2047 साठी युवा शक्ती’चा संदेश

राज्य प्रतिनिधी-संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील अग्रगण्य संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) येथे 80 वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षांच्या स्मरणोत्सवासह ‘विकसित भारत@2047 साठी युवा शक्ती’ या राष्ट्रीय संकल्पनेचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् गायनाने झाली. त्यानंतर जीएसएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला अभिवादन केले

याप्रसंगी श्री. उपाध्याय यांनी विकसित भारत@2047 या राष्ट्रीय उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी नवोन्मेष, तंत्रज्ञानातील उत्कृष्टता आणि युवा शक्तीची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. गोवा शिपयार्ड केवळ जहाजबांधणी करत नसून देशाच्या सागरी सुरक्षेला बळकटी देत आत्मनिर्भर भारताच्या उभारणीतही महत्त्वाचे योगदान देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कंपनीला नुकताच मिळालेल्या ‘शेड्यूल ए’ सीपीएसई दर्जाबद्दल त्यांनी संपूर्ण जीएसएल परिवाराचे अभिनंदन केले. हा सन्मान संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचा आणि कार्यक्षमतेचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधन व विकास, स्वदेशीकरण, बौद्धिक संपदा निर्मिती, डिजिटल परिवर्तन आणि उत्पादकता वाढ यांवर अधिक भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.मॅरिटाइम इंडिया व्हिजन 2030 आणि मॅरिटाइम अमृतकाल व्हिजन 2047 अंतर्गत उपलब्ध संधींचा लाभ घेऊन भारताला सागरी क्षेत्रात अधिक सक्षम बनविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन श्री उपाध्याय यांनी यावेळी केले.स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणांनी आणि सीआयएसएफ जवानांच्या कॉम्बॅट ड्रिलने उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

हर घर तिरंगा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सहभाग यांसारख्या उपक्रमांद्वारे जीएसएलने जबाबदार आणि शाश्वत राष्ट्रनिर्मितीप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली.

संबंधित पोस्ट

स्त्रियांनी व्यावसायिक शिक्षण प्राप्त करुन समाजामध्ये मानाचे स्थान मिळवावे- न्या. श्रीमती. आर.एस. पाटील

सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील   – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे आरोग्य सेवांचे लोकार्पण- जिल्हा वार्षिक योजनेतून बर्न आयसीयु, सोनोग्राफी मशीन

एमआयडीसीतील निष्क्रिय भूखंड काढून घेणार – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत उद्योगस्नेही धोरण व दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटिबद्ध

सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या प्रशस्त घरांची होणार स्वप्नपूर्ती- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रभादेवी परिसरातील सहा पुनर्विकासाच्या कामांची केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेत पात्र मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- 30 जून ते 29 जुलैदरम्यान बीएलओकडून घरभेटी

रामनवमीसाठी अयोध्या सज्ज..

vishwatmaklokswamivarta