vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सैन्यदल, नौदल, वायुदल भरतीपूर्व निःशूल्क प्रशिक्षण

सैन्यदल, नौदल, वायुदल भरतीपूर्व निःशूल्क प्रशिक्षण

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी निःशूल्क प्रशिक्षण दिले जाते. छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दि.४ ते १३ मे या कालावधीत प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीनी दि.३ मे रोजी सकाळी १० वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर राहावे. प्रशिक्षणार्थीना निशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे दि.२ मे रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येते वेळी त्यांनी Department of Sainik Welfare,Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील SSB- 65 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेश पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन घ्यावे

पात्रताः-

कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेसाठी अथवा नॅशनल डिफेन्स ॲकेडमी परीक्षा उत्तीर्ण व सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी स्पेशल एन्ट्रीसाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.टेक्निकल ग्रॅज्युएट्साठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.विद्यापीठ प्रवेश प्रणालीस्ठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई मेल आय डी : training.pctcnashik@gmail.com दूरध्वनी क्र. आणि 0253-2451032 किंवा व्हाटसप क्र. 9156073306 (प्रवेश पत्र मिळविण्यासाठी ) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून वकिलांसाठी 40 तासांचे प्रशिक्षणजिल्हयातील 47 वकिलांचा सहभाग

गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक

बाधितांच्या प्रश्नावर समन्वयाने मार्ग काढणार – जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड

vishwatmaklokswamivarta

शेत/ पाणंद रस्त्यांना प्राधान्य देऊन ग्रामीण रोजगाराला गती द्यावी – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

कैलासनगर स्मशानभूमीच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन; वर्षभरात साकार होणार आधुनिक ‘वैकुंठ धाम’