vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून वकिलांसाठी 40 तासांचे प्रशिक्षणजिल्हयातील 47 वकिलांचा सहभाग

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून वकिलांसाठी 40 तासांचे प्रशिक्षणजिल्हयातील 47 वकिलांचा सहभाग

 

अमरावती, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती यांच्या वतीने वकिलांसाठी 7 ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत 40 तासांचे मध्यस्थी प्रशिक्षण जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे सुरु आहे

अमरावती जिल्हयातील एकूण 47 वकील प्रशिक्षण घेत असून त्याचा फायदा पक्षकारांना व न्यायालयाला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता प्रथमेश पोपट, न्यायाधीश वरिष्ठ स्तर, बेलापुर, ठाणे सी. एन. ऑडरे यांच्या मार्फत प्रशिक्षणार्थी वकिलांना मध्यस्थीचे 40 तासांचे सखोल प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष उदाहरणे, चर्चासत्रे, प्रश्नोत्तर सत्र, तसेच ध्यान, प्रत्यक्ष मध्यस्थी सत्र अनुकरणाचा समावेश करण्यात आला आहे

या प्रशिक्षणात वकिलांना मध्यस्थी प्रक्रियेबाबत सैद्धांतिक तसेच व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. मध्यस्थीची संकल्पना व महत्त्व, मध्यस्थाची भूमिका व जबाबदाऱ्या, पक्षकारांशी प्रभावी संवाद, वाटाघाटीची कौशल्ये, विवाद निराकरणाच्या विविध पद्धती, मध्यस्थीची प्रक्रिया तसेच मध्यस्थीतील व्यावहारिक बाबी याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे.

तत्पूर्वी, 7 ऑगस्ट रोजी या प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष न्या. उज्वला एम. नंदेश्वर होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांनी केले. जिल्हा न्यायाधीश- 1 ए. जी. जोशी,. अमरावती, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, के. आर. राजपुत, अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख आदी उपस्थिती होते.

 

000000

संबंधित पोस्ट

युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी केला विजयाचा संकल्प: हनुमान जयंतीला सामूहिक गदापूजन !रामराज्य स्थापनेसाठी देशभरात ८५० हून अधिक ठिकाणी, तर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात ४५ हून अधिक ठिकाणी, सामूहिक ‘गदापूजन’ संपन्न!

ठाणे जिल्ह्यातील निर्यात प्रोत्साहनासाठी आयोजित,महाराष्ट्र निर्यात संमेलन 2024-25 संपन्न

रविवारी (दि.११) शहरातील काही भागात‘ब्लॅकआऊट’चा सराव; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

बुलढाणा जिल्ह्यात पोटनिवडणुकीची घोषणा

कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल)आस्थापनांना नियमावली जारी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक

नमुंमपा जिल्हा स्तरीय शालेय जलतरण स्पर्धेला आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते उत्साहात प्रारंभ राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नामांकित जलतरणपटू श्री शुभम वनमाळी यांची विशेष उपस्थिती..

vishwatmaklokswamivarta