vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अत्याधुनिक दोन ‘मॅग्लुमी’ मशीनचे लोकार्पण विविध रक्त चाचण्या होणार अधिक वेगाने; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा..

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अत्याधुनिक दोन ‘मॅग्लुमी’ मशीनचे लोकार्पण विविध रक्त चाचण्या होणार अधिक वेगाने; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा..

ठाणे प्रतिनिधी- सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला अत्याधुनिक अशा दोन `मॅग्लुमी ८०० व ‘मॅग्लुमी’ २००० सीएलआयए विश्लेषक’ मशीन सीएसआर उपक्रमांतर्गत प्रदान करण्यात आल्या असून त्याचे लोकार्पण आज ठाणे मनपा सभागृह नेते हणमंत जगदाळे यांच्या हस्ते झाले. या मशीनमुळे रुग्णालयातील रक्त निदान क्षमता अधिक वेगवान आणि परिणामकारक होणार असून हजारो रुग्णांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.यावेळी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक मिलिंद पाटील, मा. नगरसेविका मनाली पाटील, नगरसेवक गणेश कांबळे, नगरसेवक योगेश जानकर, नगरसेविका चंद्रकांता साळवी, शाखाप्रमुख रवींद्र पाटील, समाजसेवक जगदीश भोईर, किशोर भोईर, मिलिंद सिन्नरकर, राधे वराडकर, निनाद बोराडे, रोहन शिंदे, मा. नगरसेवक सचिन म्हात्रे आदी उपस्थित होते.

मॅग्लुमी’ ८०० आणि ‘मॅग्लुमी’ २००० या दोन्ही मशीन पूर्णपणे स्वयंचलित (फुली ऑटोमेटिक) असून त्यांची तपासणी क्षमता अत्यंत वेगवान आहे. एका तासात सुमारे २०० चाचण्या करण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे. तसेच एकाच वेळी ४० रुग्णांचे नमुने तपासता येणार आहेत. कर्करोग, थायरॉईड, ट्युमर यांसारख्या गंभीर आजारांच्या चाचण्या अधिक अचूक आणि जलद पद्धतीने करता येणार असल्याने रुग्णांच्या उपचार प्रक्रियेला मोठी मदत होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत असतात. हे रुग्णालय सर्व सुविधांनी परिपूर्ण असावे, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचे यावेळी सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी सांगितले.

“डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ यांनी दिलेल्या या दोन मशीनमुळे रुग्णालयाची सेवा अधिक सक्षम होईल. मात्र मशीन सातत्याने कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल, जेणेकरून नागरिकांना या सुविधेचा पूर्ण लाभ मिळू शकेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या मशीनमुळे ठाणे महापालिका रुग्णालयाच्या आरोग्य सेवेत आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून सर्व स्तरांतून या उपक्रमाचे स्वागत होत आहे

 00000

संबंधित पोस्ट

भाजपा जिल्हा कार्यालयात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व लोकनेते रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची आरती मंगलमय वातावरणात संपन्न

vishwatmaklokswamivarta

महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मानवीय दृष्टीकोनाने अचूक कर्तव्य पार पाडावे- पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार- महसूल विभाग शासनाचा कणा व चेहरा असल्याची भावना – महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ..

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तक संकेतस्थळावर उपलब्ध

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवाव – जिल्हाधिकारी अशोक काकडे

चिखली नगरपरिषद अध्यक्षपदी भाजपचे पंडितराव देशमुख; भाजपचे वर्चस्व…

vishwatmaklokswamivarta