vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भारतीय कृषक समाज महाराष्ट्र संस्थेचा जळगावात शेतकरी मेळावा.उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शेतकऱ्याचा सम्मान.

भारतीय कृषक समाज महाराष्ट्र संस्थेचा जळगावात शेतकरी मेळावा.उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शेतकऱ्याचा सम्मान.

अलिबाग:–(डॉ.जयपाल पाटील यांज कडून)भारतीय कृषक समाजाचे प्रेरणास्थान असलेले भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या 127व्या जयंती निमित्त शनिवार दिनांक 27 डिसेबंर2025रोजी जळगाव येथे साजरी होणार असल्याची माहीती महाराष्ट्र प्रभारी ज्योती सुरसे यांनी दिली.

यामधे गुरुवार दिनांक 25 व शुक्रवार दिनांक 26डिसेबंर रोजी जळगाव येथे संस्थेचे महाराष्ट्र राज्य भरातील विभागिय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, आणी तालुका अध्यक्ष यांचे साठी संघटन कौशल्य व शेतीविषयक उद्योग प्रशिक्षण देण्यात येणार आहे.यासाठी व पुरस्कार प्रस्तावाबाबत आपली नोंदणी मो.क्र.8880913505 येथे करावी असे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.शुभाष नलांगे यानी सांगितले आहे.

महाराष्ट्रातील प्रगतिशील शेतकरी,युवा,महिला तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन कार्य करणाऱ्यांना डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, कृषीभूषण,कृषीमहिला उद्योजिका पुरस्कार सोहळा शेतकरी मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.कृष्ण वीर चौधरी,प्रभारी महाराष्ट्र श्रीमती ज्योती सुरसे,महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.शुभाष नलांगे, महिला राज्य अध्यक्ष श्रीमती स्वाती बोरीकर यांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.

यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव श्री.मनोज टावरी,जिल्हाध्यक्ष नागपूर, भंडारा,गोंदिया, श्री.रावसाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष जळगाव, धुळे,नंदुरबार श्री.बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सांगली,सातारा,कोल्हापूर श्री.ॲड.अभय नवघटे जिल्हाध्यक्ष चंद्रपुर,गडचिरोली श्री.द्वारका भाउ पाथ्रीकर, जिल्हाध्यक्ष छ.संभाजीनगर, जालना,बीड, श्री.योगेश पुरोहित जिल्हाध्यक्ष वर्धा,यवतमाळ, वाशीम, श्री.सिध्देश्वर जोकाटे जिल्हाध्यक्ष सोलापूर, लातूर, धाराशिव ,श्री.यज्ञेश सावे जिल्हाध्यक्ष पालघर, ठाणे,श्री.केशवराव देशमुख, जिल्हाध्यक्ष अमरावती,अकोला, बुलढाणा (A) खामगाव (B) श्री.भास्कर गाणे जिल्हाध्यक्ष रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी,श्री.उदय देशमुख जिल्हाध्यक्ष नांदेड, परभणी,हिंगोली,यांचे कडे सादर करावेत. असे कार्याध्यक्ष श्री.संदीप नाईक, पुणे,श्री.संदीप केदारी सचिव, पुणे, श्री.विजय संतान, उपाध्यक्ष पुणे,श्री.मनोज वानखेडे उपाध्यक्ष, अमरावती,रुपाली गायकवाड महिला उपाध्यक्ष बुलढाणा,श्री.रमेश हिरवे,कृषी संचालक, डॉ.डी.आर.दातीर कार्यक्रम अधिकारी, नगर,श्री.राजाभाऊ देशमुख, संचालक पाटोदा बीड, श्री.वंसत शिंदे,संघटक,नाशिक, श्री.तुळशीदास नादाब,प्रसिद्धीप्रमुख यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे

संबंधित पोस्ट

सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. मैनाक घोष रुजू-मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची पदोन्नतीने बदली

vishwatmaklokswamivarta

कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर सज्जतेचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश -त्यानुसार महानगरपालिकेच्या तिन्ही रूग्णालयात राखीव बेड्सची व्यवस्था…

विठ्ठल दर्शनासाठी खामगावहून ‘हरीभक्तांची’ रेल्वे पंढरपूरकडे रवाना- केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी

मुंबई महानगरात ॲपच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी.

वारणा धरणात 20.85 टी.एम.सी. पाणीसाठा

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार

vishwatmaklokswamivarta