vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

समाजसेवेच्या आदर्शांचा गौरव – अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंतीनिमित्त जनजागृती उपक्रम-समाजसेवेच्या आदर्शांची आठवण, अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे 

समाजसेवेच्या आदर्शांचा गौरव – अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंतीनिमित्त जनजागृती उपक्रम-समाजसेवेच्या आदर्शांची आठवण, अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना (प्रतिनिधी)  मराठवाड्याच्या भूमीवर गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त जालना जिल्ह्यात 21 मे ते 31 मे 2025 दरम्यान विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंती महोत्सवात संपूर्ण जिल्हाभरात लोकसहभाग वाढवण्यासाठी आणि अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सर्वांनी कार्यक्रमात सहभावी व्हावे असे आवाहन भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी केले आहे.

· यामध्ये निबंध व रांगोळी स्पर्धा दिनांक: 28 मे 2025 रोजी दुपारी 3 ते 5 दरम्यान बालाजी मंदिर, कचेरी रोड येथे असणार आहे, सहभागासाठी सौ. संध्याताई देठे 9422269555, सौ.शुभांगीताई देशपांडे 9021337286, सौ.अरुणाताई जाधव 8999734834 यांच्याशी संपर्क करावा.· मंदिर स्वच्छता, महाआरती, वेदपठन व भक्तिगीत दिनांक: 28 मे रोजी श्रीराम मंदिर, पलंगबावडी, जुना जालना व २९ मे जोगेश्वरी माता मंदिर, पाहेगाव या ठिकाणी करण्यात येणार आहे.

· नाटक, पथनाट्य, चित्ररथ प्रदर्शन हे दिनांक: 28 मे सकाळी 10.00 वा सावरकर चौक, गांधी चमन चौक येथे होणार आहे.· महिला मेळावा (अहिल्यादेवी वेशभूषेत मिरवणूक) दिनांक: 31 मे रोजी सकाळी 10.00 वा अमृतेश्वर महादेव मंदिर ते बालाजी मंदिर दरम्यान करण्यात येणार आहे.· वकृत्व स्पर्धा दिनांक : 30 मे रोजी, भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे होणार आहे, या उपक्रमांबाबत अधिक माहिती आणि सहभागासाठी प्रा.राजेंद्र भोसले 9422992555 यांच्याशी संपर्क साधावा.

· महिला मॅरेथॉन दिनांक: 31 मे सकाळी 6.00 वा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून होणार आहे.· बुद्धिजीवी संमेलन दिनांक: 31 मे रोजी सायं. 5.00 वा भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे होणार आहे.

या कार्यक्रमांच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या जीवनकार्याद्वारे समाजास दिलेल्या मूल्यांचा जागर करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून ऐतिहासिक जयंती महोत्सवात योगदान द्यावे, असे आवाहन सौ. संध्याताई देठे, सौ. शुभांगीताई देशपांडे, सौ. अरुणाताई जाधव, श्री. कपिल दहेकर, श्री. तुलजेश चौधरी, श्री. सुनिल खरे, श्री. महेश निकम, श्री. संजय डोंगरे, श्री. अमोल धानुरे, श्री. कृष्णा गायके, श्री. कृष्णा लिंगसे श्री. कैलास सचदेव, सौ. रश्मी टेकवाणी, सौ. रेखा टेकवाणी, श्री. सतीशचंद्र प्रभू, श्री. विकास कदम, श्री. मनोज बिडकर आयोजकांतर्फे करण्यात आले आ

संबंधित पोस्ट

नमुंमपाच्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक कार्यात कापडी पिशव्या वितरण करुन स्टेट बँक ऑफ इंडियाचा सहभाग*

vishwatmaklokswamivarta

पुनर्विकासातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत – विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर

vishwatmaklokswamivarta

हसूल सप्ताहनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कार्यक्रम उत्साहात संपन्न  · जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला परतुर शहरातील विविध विभागांचा आढावा..

खारघर परिसरातील दारूबंदीचे निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रजा फाउंडेशनचा धक्कादायक रिपोर्ट-  मुंबई महानगरपालिकेच्या गैर कारभाराचा भांडाफोड-पालिका नागरिक सेवा पुरवठ्यात आघाडी मात्र पर्यावरण आणि हवामान बदलाच्या बाबत उत्तरदायित्वात पिछाडी, प्रजा फाउंडेशन च्या नागरिक अहवालामध्ये धक्कादायक आकडेवारी सादर

vishwatmaklokswamivarta

वन पर्यटनासाठी पाच वनसफारी गाड्या व पोलिसांच्या ६३ दुचाकी वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण जळगाव जिल्ह्यात वन्यजीव पर्यटन व पोलीस आधुनिकीकरणाला गती

vishwatmaklokswamivarta