vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डोंबिवलीत राष्ट्रीय सुरक्षा जनजागृती कार्यक्रम संपन्न

डोंबिवलीत राष्ट्रीय सुरक्षा जनजागृती कार्यक्रम संपन्न

ठाणे, प्रतिनिधी:- राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार आणि नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पूर्व येथील भाऊ काका उद्यान, टिळक नगर पोलीस स्टेशन जवळ, सर्वोदय नगर पाथर्डी येथे रविवार, दि.25 मे 2025 रोजी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम डोंबिवली स्काऊट गाईड संस्थेचे पदाधिकारी आणि हुतात्मा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजू घुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. रामनगर, डोंबिवली पूर्व (सिव्हिल डिफेन्स, ठाणे) चे डिव्हिजनल वॉर्डन डॉ.राहुल घाटवळ यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. त्यांना त्यांचे सहकारी स्वयंसेवक अशोक धांधा, अमर कुलकर्णी आणि जतीन मोता यांनी चर्चा व परिसंवादात सहकार्य केले.

या कार्यक्रमात सद्य:स्थितीतील आपत्कालीन मार्गदर्शक सूचना (इशारा प्रणाली, क्रॅश ब्लॅकआउट, नागरिकांची कर्तव्ये, अफवांची माहिती) यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नागरिकांना आपत्कालीन विमोचन पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले, जेणेकरून नागरिक स्वतःचे व आपल्या कुटुंबियांचे जीवन सुरक्षित ठेवू शकतील. नागरी संरक्षण दल (सिव्हिल डिफेन्स कॉर्प) कसे कार्यरत आहे, याचीही माहिती उपस्थितांना देण्यात आली.

या सत्रात प्रत्येक सोसायटीच्या कोअर कमिटीच्या सदस्यांनी भाग घेतला आणि त्यांच्या सोसायटीमधील प्रत्येक सदस्याला ही माहिती देण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे नागरिकांना आपली सुरक्षा स्वतः करता येईल, अशी अपेक्षा आहे.

पुढील आठवड्यात याच ठिकाणी नागरी संरक्षण दलाच्या प्राथमिक प्रशिक्षण कोर्सचे नियोजन करण्याची इच्छाही अनेकांनी दर्शवली

या कार्यक्रमाला लक्ष्मीकांत कुलकर्णी, विनायक पवार, हितेश गुप्ता, सुनील जोशी, ईश्वर पाटील, आरती पाटील या रहिवाशांनी सहकार्य केले. टिळकनगर पोलीस स्टेशनचे सहाय्य उपलब्ध झाले आणि पोलीस उपनिरीक्षक श्री. विचारे याप्रसंगी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नागरी संरक्षण दल, नवी मुंबई, समूह ठाणे (रामनगर विभाग) आणि संताजी प्रौढ शाखा, पाथर्ली/गोपाळ नगर, लोकमान्य नगर, डोंबिवली पूर्व यांनी यशस्वी नियोजन केले.

00000

संबंधित पोस्ट

अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मरोळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासळी बाजार व कोळी भवन उभारावे -मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

हिंसा आणि खेळ एका वेळी होऊ शकत नाही; शाहरुख खानला क्षमा नाही !* – हिंदु जनजागृती समिती

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टपूर्तीत महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• महिलांच्या सहभागाने विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट गाठणे शक्य• राष्ट्रीय व राज्य महिला आयोगाच्यावतीने शक्ती संवादाचे आयोजन

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणेमार्फत“मास्टर ट्रेनर्स” प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

विविध बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवी खातेदारांना परत मिळण्याकरीता बँकांशी संपर्क साधण्याचे आवाहन